क्रीडा

IND vs PAK : टीम इंडियात दोन मोठे बदल! राहुल-इशान दोघेही खेळणार, जाणून घ्या भारताची प्लेइंग-11

Kiran Mahanavar

Ind vs Pak asia cup super 4 match Team India playing 11 : कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप स्पर्धेतील सुपर-4 फेरीचा सामना खेळला जात आहे. बाबर आझमने नाणेफेक जिंकली असून पाकिस्तान संघ प्रथम गोलंदाजी करणार आहे. या सामन्यात केएल राहुलने टीम इंडियात एन्ट्री केली आहे.

दुखापतीमुळे राहुल पहिल्या दोन सामन्यात खेळला नव्हता पण आता तो तंदुरुस्त आहे. पाकिस्तानने सुपर-4 फेरीतील पहिला सामना जिंकला. दोन्ही देशांमधील शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला होता.

नाणेफेक जिंकल्यानंतर बाबर आझम म्हणाला, “खेळपट्टीत ओलावा आहे. त्यामुळे आम्ही प्रथम गोलंदाजी करू. भारत-पाकिस्तान सामना नेहमीच मोठा असतो. पण आपण त्याचा फारसा विचार करत नाही. खेळाच्या प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमची टीम एकच आहे.

त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, मी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणार होतो. रोहितने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यरच्या जागी केएल राहुलचा समावेश करण्यात आला आहे. कोणाची बॅटिंग ऑर्डर काय आहे हे पाहणे रंजक ठरणार आहे.

पाकिस्तानने सुपर-4 फेरीतील पहिला सामना जिंकला. दोन्ही देशांमधील शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्या सामन्यात भारतालाच फलंदाजी करता आली. त्या सामन्यात शाहीन आफ्रिदीने 4 विकेट घेतल्या होत्या.

भारताचे प्लेइंग-11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तानचे प्लेइंग-11 : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip BJP Leader Statement : कथित ऑडिओ क्लिपवर प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यानंतर भाजपच्या मोठ्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

IND A vs NZ A Live: लोकेश राहुल ०, यशस्वी जैस्वाल १७; भारताचा डाव ११३ धावांवर गडगडला, नागपूरचा यश राठोड एकटा भिडला

Drought Crisis: सरकारी विभागांच्या निधीला कात्री ; दुष्काळाचा फटका; मुख्यमंत्र्यांच्या २० टक्के निधी कपातीच्या सूचना

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

Belgaum-Kolhapur Direct Railway : सर्वेक्षण झाले, पण प्रत्यक्ष काम कधी? बेळगाव-कोल्हापूर रेल्वेच्या प्रतीक्षेला कंटाळून नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत, जनआंदोलनाचा निर्धार

SCROLL FOR NEXT