SA vs IND  esakal
क्रीडा

SA vs IND : राहुल शेर तर एल्गर सव्वाशेर! भारताला पहिल्याच सामन्यात मोहम्मद शमीची उणीव भासली

अनिरुद्ध संकपाळ

South Africa Vs India 1st Test Day 2 : पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताकडून केएल राहुलने झुंजार शतक ठोकले. मात्र त्याच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेकडून डीन एल्गरने देखील नाबाद 140 धावा करत भारताला चोख प्रत्युत्तर दिले. भारताला आज मोहम्मद शमीची चांगलीच उणीव भासली.

भारताने दुसऱ्या दिवशी 208 धावांपासून पुढे खेळत पहिल्या डावात 245 धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान, 70 धावांवर नाबाद असलेल्या केएल राहुलने आपले शतक पूर्ण केलं. भारताला सन्मानजनक धावसंख्येजवळ पोहचवले.

मात्र दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गरने नाबाद 140 धावांची खेळी करत आफ्रिकेला दुसऱ्या दिवसअखेर 5 बाद 256 धावांपर्यंत पोहचवलं. एल्गरला डेव्हिड बेडिंगहमने 56 धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली. भारताकडून बुमराह आणि सिराजने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

पहिले सत्र :

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांनी नवव्या विकेटसाठी 47 धावांची दमदार भागीदारी रचली. या भागीदारीत 42 धावांचा वाटा एकट्या केएल राहुलचा होता. पहिल्या दिवशी 70 धावांवर नाबाद असलेल्या राहुलने झुंजार खेळी करत शतक ठोकलं. या शतकी खेळीमुळे भारताने आपल्या पहिल्या डावात 245 धावांपर्यंत मजल मारली.

यानंतर आफ्रिकेने आपला पहिला डाव सुरू केला. मात्र मोहम्मद सिराजने एडिन माक्ररमला 5 धावांवर बाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. या धक्क्यातून डीन एल्गर आणि टोनी डेझॉर्जी यांनी आफ्रिकेला सावरलं.

दुसरे सत्र :

दुसऱ्या सत्रात भारताच्या जसप्रीत बुमराहने चांगला मारा करत टोनी डेझॉर्जीला 28 धावांवर बाद करत जोडी फोडली. त्यानंतर लगेचच बुमराहने पेटर्सनचा 2 धावांवर त्रिफळा उडवत आफ्रिकेची अवस्था 3 बाद 113 धावा अशी केली.

मात्र यानंतर एल्गरने डेव्हिड बेडिंगहमसोबत नाबाद भागीदारी रचली. एल्गरने आपले शतक देखील पूर्ण केले. या सत्रात आफ्रिकेने 33 षटकात 4.39 च्या सरासरीने 145 धावा केल्या तर भारताला दोन विकेट्स घेण्यात यश आलं.

तिसरे सत्र :

तिसऱ्या सत्रात आफ्रिकेची जोडी एल्गर आणि बेडिंगहमने आपली भागीदारी शतकाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी आफ्रिकेला 200 धावांचा टप्पा देखील पार करून दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी रचली. आफ्रिकने भारताच्या 245 धावांची बरोबरी केली. बेडिंगहमने देखील अर्धशतक ठोकले.

मात्र मोहम्मद सिराजने ही जोडी फोडली. प्रसिद्ध कृष्णानेही आपला पहिला बळी टिपत कायल व्हेर्रेयन्नेला बाद केलं. मात्र नाबाद 140 धावा करणाऱ्या डीन एल्गरने दुसऱ्या दिवसअखेरपर्यंत आफ्रिकेला पहिल्या डावात 11 धावांची आघाडी मिळवून दिली होती. अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ देखील लवकर थांबवण्यात आला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

SCROLL FOR NEXT