IND vs AUS Final  esakal
क्रीडा

IND vs AUS Final : फोटोचा इतिहासच सांगतो ट्रॉफीवर कब्जा रोहितचाच... दोन कर्णधार पोहचले ऐतिहासिक अडालज विहिरीवर

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Australia Final : भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यांनी आज अहदमाबादमधील प्रसिद्ध अडालज विहिरीला भेट दिली. यावेळी या दोघांनी ट्रॉफीसोबत फोटोशूट देखील केले. हे फोटोशूट वर्ल्डकप 2023 च्या फायनलच्या पूर्वसंध्येला झाले.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हे 2023 मध्ये आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दुसऱ्यांदा आमने सामने आले आहेत. या वर्षीच्या सुरूवातीला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोहचले होते.

हा सामना ओव्हलवर झाला होता. जरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ऑस्ट्रेलियाने जिंकली असली तरी उद्या मात्र त्यांच्यासमोर एक वेगळंच आव्हान असणार आहे.

वर्ल्डकप ट्रॉफीसोबतच्या फोटोशूटवेळी रोहित शर्मा ट्रॉफीच्या डाव्या बाजूला उभा आहे तर कमिन्स हा उजव्या बाजूला उभा आहे. इतिहास पाहिला तर फायनलमध्ये पोहचलेल्या संघाचा जो कर्णधार ट्रॉफीच्या डाव्या बाजूला उभा असतो तो सहसा ट्रॉफी जिंकतो. महेंद्रसिंह धोनी, मायकल क्लार्क, इऑन मॉर्गन हे फोटोशूटवेळी डाव्या बाजूला उभे होते. त्या सर्वांनी वर्ल्डकपवर आपला कब्जा केला.

अडालज विहिरीचा इतिहास काय?

अडालज विहिरीबद्दल बोलायचं झालं तर ही विहीर 1498 मध्ये बांधण्यात आली आहे. गुजरातमधील हा वास्तूशिल्पाचा एका उत्तम नमुना आहे. ही पायऱ्यांची सुंदर नक्षीकाम केलेली विहीर तब्बल 5 मजली आहे. ही ऐतिहासिक विहीर अहमदाबादला लागून असलेल्या भागात आहे. ही विहीर गुजरातच्या समृद्ध संस्कृतीचं प्रतिनिधित्व करते. गुजरात हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं राज्य आहे. इथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! दहा वर्षे नोकरी केल्यानंतर किती पेन्शन मिळेल? नवीन EPS योजना काय आहे?

Latest Marathi Update : विद्यार्थ्यांना मुख्य संदेश हाच द्यायचा आहे की, आम्ही तुमच्या सोबत आहोत - राहुल गांधी

Torch Bus Viral Video: जीवघेणा प्रवास! केवळ टॉर्चच्या उजेडात धावली प्रवाशांनी भरलेली बस, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ

IND U-19 vs SL U-19 : भारताचा श्रीलंकेवर 211 धावांनी दणदणीत विजय; युवा कसोटी मालिका 1-0 ने खिशात

SCROLL FOR NEXT