India vs England 3rd Test
India vs England 3rd Test  
क्रीडा

INDvsENG 3rd Test : मोठ्या मैदानात टीम इंडियाचा थाट; ICC टेस्ट चॅम्पियनशिपमधून इंग्लंड आउट

सकाळ ऑनलाईन टीम

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगलेला सामना दुसऱ्या दिवशी जिंकत टीम इंडियाने मालिकेत 2-० अशी आघाडी घेतली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अक्षर पटेलच्या सहा विकेट्स त्याला अश्विनने 3 विकेट घेत दिलेली साथ आणि ईशांत शर्माला मिळालेली एकमेव विकेटच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांत आटोपला. 

भारतीय संघ मोठी आघाडी घेईल असे वाटत असताना इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने आपल्या फिरकीतील दाखवलेली जादू आणि लीचने त्याला दिलेली साथ याच्या बळावर इंग्लंडने भारतीय संघाचा पहिला डाव 145 धावांत गुंडाळला. भारतीय संघाला केवळ 33 धावांची आघाडी मिळाली. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय फिरकीसमोर पुन्हा नांगी टाकली. अक्षर पटेलने पुन्हा पाच विकेट घेतल्या. अश्विनच्या चार आणि वॉशिंग्टनने घेतलेली एक विकेट यांच्या फिरकीसमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 81 धावांत गुंडाळला. भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी 49 धावांचे लक्ष्य मिळाले होते. रोहित शर्माने षटकाराने भारतीय संघाचा विजय साकार केला. 

मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपली दावेदारी भक्कम केली आहे. दुसरीकडे इंग्लंडचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील एक संघ न्यूझीलंडविरुद्ध फायनल खेळेल. अहमदाबादमधील चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत याचे चित्र स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT