india vs england test virat kohli team india players visit restaurant London Birmingham bcci sports cricket 
क्रीडा

Ind vs Eng: कोरोनाचा फटका बसूनही वठणीवर येईनात; टीम इंडियाच्या पार्ट्या सुरूच

टीम इंडियाच्या या खेळाडूंनी पुन्हा सर्व मर्यादा ओलांडल्या!

Kiran Mahanavar

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये बर्मिंगहॅम येथे १ जुलैपासून एकमेव कसोटी सामना खेळल्या जाणार आहे. या टेस्टपूर्वी कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर तो आजून पण आयसोलेशनमध्ये आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने खेळाडूंना कोठे न जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, टीम इंडियाच्या या खेळाडूंनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत. (india vs england test virat kohli team india players visit restaurant London)

इंग्लंडमध्ये बाहेर फिरताना रोहित-विराटला बीसीसीआयने नुकतेच वॉर्निंग दिली होती. पण याचा परिणाम टीम इंडियाच्या खेळाडूंवर झालेला नाही. आता बर्मिंगहॅममधील एका रेस्टॉरंटमध्ये खेळाडूंचे डिनर पार्टीचे फोटो व्हायरल होत आहेत. एवढेच नाही तर या खेळाडूंनी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांसोबत फोटोही काढले आहे. यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, नवदीप सैनी आणि ऋषभ पंत यांच्यासह अनेक खेळाडू दिसत आहेत.

रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरच बीसीसीआयने सर्व खेळाडूंना प्रोटोकॉल पाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. गेल्या काही दिवसांत अशी अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही खेळाडू चाहत्यांसोबत फोटो क्लिक करत होते. हे धोकादायक असू शकते. बीसीसीआयने राहण्याचा सल्ला दिला आहे.

इंग्लंड या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये 1 कसोटी सामना, 3 टी-20 सामने आणि फक्त 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. गेल्या वर्षी टीम इंडिया ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली होती, मात्र या दौऱ्यातील शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचे काही खेळाडू पॉझिटिव्ह आढळले त्यामुळे खेळे शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT