Asian Champions Trophy 2023 sakal
क्रीडा

Asian Champions Trophy 2023 : जपानने भारताला बरोबरीत रोखले; मलेशियाकडून चीनचा धुव्वा

आशियाई चॅम्पियन्स हॉकी : यांग झिहून याने पेनल्टी स्ट्रोकवर दक्षिण कोरियाला बरोबरी साधून दिली

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई : सलामीच्या लढतीत चीनचा ७-२ असा धुव्वा उडवणाऱ्या यजमान भारतीय पुरुष हॉकी संघाला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी या हॉकी स्पर्धेतील शुक्रवारच्या लढतीत जपानविरुद्ध १-१ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले.

जपानकडून केन नागायोशी याने २८व्या मिनिटाला गोल करीत भारताला धक्का दिला. जपानने ही आघाडी ४२व्या मिनिटांपर्यंत कायम ठेवली. हरमनप्रीत सिंगने ४३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. भारताचा पुढील सामना आता मलेशियाशी, तर जपानचा पाकिस्तानशी होणार आहे.

पाकिस्तानच्या हॉकी संघाने गतविजेत्या दक्षिण कोरिया हॉकी संघाला १-१ अशा बरोबरीत रोखले. शाहीद अब्दुल याने शानदार फिल्ड गोल करीत पाकिस्तानला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. अखेरच्या क्वॉर्टरमध्ये दक्षिण कोरियाने बरोबरीचा गोल केला. यांग झिहून याने पेनल्टी स्ट्रोकवर दक्षिण कोरियाला बरोबरी साधून दिली.

चीनच्या हॉकी संघाला प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. भारताकडून त्यांना सलामीच्या लढतीत ७-२ असे पराभवाला सामोरे जावे लागले होते. मलेशियाने शुक्रवारी त्यांचा ५-१ असा धुव्वा उडवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon In Goa Konkan : मॉन्सून गोवा, कोकण किनारपट्टीवर दाखल? राज्यात ४ दिवस वादळी पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

राज्यसभेसाठी छगन भुजबळांचा पत्ता कट? जागेसाठी राष्ट्रवादीत नव्या 'या' ४ नावांची चर्चा; महायुतीचा '१२-३-२' फॉर्म्युला काय?

Mumbai Indians: रोहित शर्मा RR विरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? जयवर्धनेने दिले अपडेट्स, संघाच्या अपयशाचं कारणही सांगितलं

ICC New Rule: चेंडूचा रंग बदलणार, गौतम गंभीर ड्रिंक्स ब्रेकमध्ये टीमला रणनीती सांगायला येणार; क्रिकेटमध्ये नव्या बदलाचे संकेत

Petrol-Diesel Price: GST लागू झाल्यास पेट्रोल-डिझेल किती स्वस्त होऊ शकतं? जाणून घ्या धक्कादायक गणित

SCROLL FOR NEXT