india vs new zealand 
क्रीडा

IND vs NZ : न्यूझीलंडमध्ये सिराज-अर्शदीपचा तांडव! 14 धावा मध्ये 7 खेळाडूंना पाठवले तंबूत...

Kiran Mahanavar

India vs new zealand : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. तिसऱ्या टी-20 मध्ये न्यूझीलंड संघ प्रथम खेळताना 19.4 षटकात 160 धावा करून सर्वबाद झाला. एकवेळ त्यांची धावसंख्या 2 विकेटवर 130 धावा होती. अशा स्थितीत संघ 180 धावांचा टप्पा पार करेल असे वाटत होते. मात्र यानंतर वेगवान गोलंदाज सिराजने 4 बळी घेत किवी संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. सिराजने 4 षटकात 17 धावा देत 4 बळी घेतले. त्याची टी-20 कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनेही 4 बळी घेतले.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली. अर्शदीप सिंगने डावाच्या दुसऱ्याच षटकात न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्याने फिन ऍलनला एलबीडब्ल्यू आऊट केले. अॅलनला तीन धावा करता आल्या. यानंतर सिराजने मार्क चॅपमनला अर्शदीपकडे झेलबाद केले. त्यानंतर डेव्हॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स यांनी न्यूझीलंडची धुरा सांभाळली.

दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 63 चेंडूत 86 धावांची भागीदारी केली. त्यानंतर सिराजने 16व्या षटकात फिलिप्सला बाद करून ही भागीदारी प्रथम मोडली. यानंतर किवी संघाला सावरता आले नाही. फिलिप्सने 33 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. यानंतर पुढील 14 धावा करताना किवी संघाने 7 विकेट गमावल्या. अर्शदीप आणि सिराज या दोघांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पुण्यात मुसळधार पावसाचा कहर; वाघोली-लोहगाव रस्ता बंद, खासगी कंपनीची बस अडकली, सकाळपासून घडलेल्या घटना!

Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यात ऊन-सावलीच्या खेळात मध्येच कधीतरी रिमझिम, अलर्टमध्येही पावसाची पाठ; दीड ते तीन मिमी नोंद

Latest Marathi News Update: वंरध घाटात पुन्हा दरड कोसळली, ५ ते ७ गाड्या अडकल्या; रस्ता बंद

सेलिना जेटलीच्या पुनरागमनामागचं कारण काय? १५ वर्षांनी स्वीकारली कारकिर्दीतील 'सर्वात मोठी' भूमिका

Bhimashankar Update : भीमाशंकरला जाण्याचा बेत आखताय? मुसळधार पावसामुळे 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद, कधी होणार पुन्हा खुली?

SCROLL FOR NEXT