Ishan Kishan  Sakal
क्रीडा

IND vs SL : 'ई'शानदार सेंच्युरी हुकली; पण...

सकाळ डिजिटल टीम

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय सलामी जोडीनं श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली, सलामीवीर ईशान किशनला (Ishan Kishan) या सामन्यात शतकी खेळी करण्याची संधी होती. पण 89 धावांवर तो तंबूत परतला. त्याने 56 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 89 धावा केल्या. शनाकाच्या (Shanaka) गोलंदाजीवर लियांगे याच्याकडे झेल देऊन तो बाद झाला. 16 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने विकेट गमावली. वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेत ईशान किशनला नावाला साजेसा खेळ करता आला नव्हता. यावेळी त्याच्यावर जोरदार टीकाही झाली. पण आता त्याने आपल्यावर विश्वास का ठेवतात हे दाखवून दिले. (India vs Sri Lanka 1st T20I Ishan Kishan Miss First T20 century Just 11 Runs)

ईशान किशनने आपल्या टी-20 कारकिर्दीतील 9 व्या सामन्यात दुसरे अर्धशतक झळकावले. जर त्याने शतक पूर्ण केले असते तर टी-20 मध्ये सेंच्युरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला असता. ईशान किशनच्या अर्धशतकी खेळीत श्रीलंकन खेळाडूंचाही वाटा आहे. भारतीय डावातील 7 व्या षटकात त्याला जीवनदान मिळाले होते. या षटकातील चौथ्या चेंडूवर डीपच्या दिशेन त्याने हवेत फटका मारला. लियांगे चेंडूपर्यंत पोहचला. पण त्याला हा झेल घेता आला नाही. यावेळी ईशान किशन 43 धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने अर्धशतक पूर्ण केले.

श्रेयस अय्यरचंही अर्धशतक

कर्णधार रोहित शर्मासोबत शतकी भागीदारी करणाऱ्या ईशान किशन याने श्रेयस अय्यरसोबत दुसऱ्या विकेटसाठी 44 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ईशान बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने 28 चेंडूत 57 धावांची खेळी करत भारतीय संघाच्या धावफलकावर 199 धावा लावल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT