Indian athletics Jyothi yarraji won the gold medal sakal
क्रीडा

ज्योतीचा हर्डल्समध्ये विक्रम; अनुराधाचा २० वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम इतिहासजमा

लिमासोल येथे सायप्रस आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत हा विक्रम मोडला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महिलांच्या १०० मीटर हर्डल्स शर्यतीत गेल्या २० वर्षांपासून अबाधित असलेला ओडिशाच्या अनुराधा बिस्वालचा राष्ट्रीय विक्रम अखेर मोडीत निघाला. हवेचा वेग जास्त असल्याने एक महिन्यापूर्वी राष्ट्रीय विक्रमापासून वंचित राहिलेल्या ज्योती यराजीने लिमासोल येथे सायप्रस आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत हा विक्रम मोडला. याशिवाय लीली दासने पंधराशे मीटर शर्यतीतही सुवर्णपदक जिंकले.

मूळ आंध्र प्रदेशची असलेली आणि सध्या ओडिशातील रिलायन्स फाऊंडेशन हायपरफॉर्मन्स सेंटरमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय ज्योतीने १३.२३ सेकंदांची वेळ देताना नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. ही कामगिरी करताना तिने अनुराधा बिस्वालने २००२ मध्ये दिल्ली येथे नोंदविलेला १३.३८ सेकंदांचा विक्रम इतिहासजमा केला.

विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांत ज्योतीने दोनदा अनुराधाच्या राष्ट्रीय विक्रमाला मागे टाकले होते. प्रथम २०२० मध्ये आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूरचे प्रतिनिधित्व करताना मुडबिद्री (कर्नाटक) येथे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत तिने १३.०३ सेकंदांची वेळ दिली होती. मात्र, तिथे नाडा (राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटना) चे अधिकारी व भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. त्यामुळे राष्ट्रीय विक्रम नाकारला गेला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात कोझिकोड येथे फेडरेशन करंडक स्पर्धेत तिने पुन्हा १३.०९ सेकंदाची वेळ दिली. यावेळी वाऱ्याचा वेग २.१ मीटर प्रतिसेकंद असल्याने हा विक्रम नाकारला गेला होता. कारण नियमाप्रमाणे वाऱ्याचा वेग २ मीटर प्रतिसेकंद किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे असते.

लीलीला सुवर्ण, अमलानला ब्राँझ

या स्पर्धेत भारताचे चार खेळाडू सहभागी झाले होते. त्यापैकी तिघांनी पदके जिंकली. त्यात लीली दासने पंधराशे मीटरची शर्यत जिंकून भारताला दुसरे सुवर्ण मिळवून दिले. तिने ४ मिनिटे १७.७९ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. गेल्या महिन्यात फेडरेशन करंडक स्पर्धेत दोनशे मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम करणारा आसामचा मात्र, रिलायन्स फाऊंडेशनमध्ये सराव करणाऱ्या अमलान बोरगोहेनने ब्राँझपदक जिंकले. त्याने २१.३२ सेकंद अशी वेळ दिली. २०.५२ सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम सध्या त्याच्या नावावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JPSC Student Protest: विद्यार्थी आंदोलनाचा दबाव वाढला, JPSC च्या ३ सदस्यांचा राजीनामा; झारखंडमध्ये मोठी घडामोड

बुमराह, साई सुदर्शनसह स्टार्स दुखापतग्रस्त; VVS Laxman यांचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, 'CoE केवळ रिहॅब सेंटर नाही, तर...'

काजू कतली खरेदी केली अन् डब्यात आढळल्या जिवंत अळ्या; ग्राहकाच्या तक्रारीनंतर FDAची मॉलवर कारवाई

Chikhaldara Accident: सेल्फी घेताना तोल गेला अन् दरीत कोसळले; चिखलदऱ्यात बार्शीटाकळीतील ४० वर्षीय युवकाचा मृत्यू, मित्रांसोबत फिरायला गेले अन्..

Pune Nashik Highspeed Rail: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग बदलला; अमोल कोल्हेंच्या निष्क्रियतेमुळेच हे घडले, भाजपचा आरोप

SCROLL FOR NEXT