Kuldeep Yadav Virat Kohli Dinesh Karthik Sakal
क्रीडा

Virat Kohli : कोहलीचा फोन हरवला अन् नाव कार्तिकवर? मोबाईलचा फोटो अन् कुलदीप यादवचं ट्वीट चर्चेत

कुलदीप यादवने या मोबाईलच्या बॉक्सचा फोटोही शेअर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेटर विराट कोहलीचा मोबाईल फोन हरवला असल्याचं त्याने नुकतंच ट्वीटद्वारे सांगितलं होतं. आता हा फोन सापडला आहे. पण हा फोन हरवण्याचा आणि दिनेश कार्तिकचा काय संबंध? अशी चर्चाही होत आहे. नक्की काय आहे कारण?

विराट कोहलीने काल ट्वीट केलं होतं की, बॉक्समधून काढण्याआधीच नवा कोरा मोबाईल फोन हरवण्यासारखं दुःख कोणतंच नाही. त्याचं हे ट्वीट लगेचच व्हायरल झालं आहे. नेटकऱ्यांनी आणि कोहलीच्या चाहत्यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या होत्या. आता हा फोन सापडला आहे.

क्रिकेटर कुलदीप यादवने ट्वीट करत हा फोन सापडल्याची माहिती दिली आहे. या फोनच्या बॉक्सचा फोटोही त्याने शेअर केला आहे. त्याच्या ट्वीटमुळे आता चाहते गोंधळले आहेत. कारण या सगळ्या प्रकरणात दिनेश कार्तिकचीही एन्ट्री झाली आहे.

कुलदीप यादव आपल्या ट्वीटमध्ये म्हणतो, "विराट कोहली, हा बॉक्स आहे का? मला आपल्या हॉटेलच्या पूलजवळ हा बॉक्स सापडला आहे. कसली भारी डिझाईन आहे. पण दिनेश कार्तिकने तो माझ्याकडून घेतला. तू त्याला विचारलंस का?"

त्यावर कमेंट्सही भन्नाट आल्या आहेत. हे कसलं प्रमोशन सुरू आहे, असा सवाल अनेक नेटकऱ्यांनी विचारला आहे. तर हे काय चाललंय, उद्या मॅच आहे, लक्ष द्या असा सल्लाही अनेकांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT