Wrestling News WFI  esakal
क्रीडा

Wrestling News WFI : इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने कुस्ती महासंघाची अ‍ॅड हॉक समिती केली विसर्जित

अनिरुद्ध संकपाळ

Indian Olympic Association : भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने भारतीय कुस्ती महासंघाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचा कारभार पाहणारी तदर्थ समिती विसर्जित केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने WFI ची नवीन कार्यकारणी बर्खास्त केली होती. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने कुस्ती महासंघाचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी तदर्थ समिती (Ad-Hoc Committee) स्थापन केली होती.

UWW ने भारतीय कुस्ती महासंघाची सदस्यता केली बहाल

या महिन्यात युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाची सदस्यता बहाल केली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात WFI च्या अध्यक्षपदाची निवडणूक वेळेत न झाल्याने UWW सदस्यता रद्द केली होती. मात्र त्यानंतर झालेल्या बैठकीत UWW ने काही अटी शर्तींसह WFI ची सदस्यता पुन्हा बहाल करण्याचा निर्णय घेतला.

विनेश, बजरंग आणि साक्षीने केला होता विरोध

विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक सारख्या स्टार कुस्तीपटूंनी WFI चे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी बृजभूषण यांच्याविरूद्ध प्रदर्शन केले होते. त्यांनी बृजभूषण यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती.

नुकतीच झाली होती ट्रायल

तदर्थ समितीच्या नेतृत्वाखील पुरूष आणि महिलांच्या कुस्ती चाचणी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या आहे. पुरूषांमध्ये बजरंग पुनियाला पराभवाचा सामना करावा लागला तर महिलांमध्ये मोठ्या ड्राम्यानंतर विनेश पोगाटने विजय मिळवला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लेन पूर्ण बंद, पुणे मार्गावर १२ किमी वाहनांच्या रांगा; उलटलेल्या टँकरमधून गॅस गळती वाढली

Pankaja Munde: बाबासाहेबांना अभिवादन नाही… अन् गाव आक्रमक! पंकजा मुंडेंना ग्रामस्थांनी रोखलं, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक ठप्प, १२ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

Chhatrapati Sambhajinagar Politics: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमआयएम’ची भाजपला धक्का देण्याची तयारी; राजकारणात सगळं शक्य, इम्तियाज जलील यांचा इशारा!

मुंबई एक्सप्रेसवे वाहतूक ठप्पच, पर्यायी मार्ग वापरा; प्रवासाला ४-५ तास जास्त लागू शकतात, ट्राफिक पोलिसांचे आवाहन

SCROLL FOR NEXT