tenus sakal
क्रीडा

पाकमध्ये खेळण्यास मंजुरी मिळण्याची शक्यता

इस्लामाबादमधील भारत-पाक डेव्हिस करंडक सामना

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली/कराची : भारतीय टेनिस संघ डेव्हिस करंडक सामन्यासाठी पाकिस्तानमध्ये खेळण्यास केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यता भारतीय टेनिस फेडरेशनने व्यक्त केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिड करंडक गट-१ मधील सामना इस्लामाबादमध्ये ३-४ फेब्रुवारी रोजी नियोजित आहे. या सामन्यासाठी आपला संघ पाकिस्तानमध्ये पाठवू शकतो का, असा विचारणा अखिल भारतीय टेनिस संघटनेने क्रीडा खात्याकडे केलेली आहे.

आम्हाला अजून लेखी स्वरुपात कोणतीही मान्यता मिळालेली नसली तरी लवकरच ती मिळेल. ही द्विपक्षीय मालिका किंवा स्पर्धा नाही. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनची आहे आणि अशा जागतिक स्पर्धांमध्ये हस्तक्षेप करण्याचे केंद्र सरकारे धोरण नाही, असे आम्हाला सांगण्यात आल्याचे भारतीय टेनिस संघटनेचे सरचिटणीस अनिल धुपकर यांनी सांगितले.

असे असले तरी अशा स्पर्धांमध्ये आणि प्रामुख्याने पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी एक नियोजित पद्धत आहे. आम्ही केलेली मागणी क्रीडा खाते गृह खात्याकडे पाठवते आणि गृह खाते सर्वबाबींचा अभ्यास करुन मग अंतिम निर्णय देते. असे सांगताना धुपकर यांनी आपला संघ इस्लामाबादध्ये जाण्याची तयारी करत असल्याचीही माहिती दिली.

दरम्यान भारताकडून आम्ही या डेव्हिस करंडक सामन्यात खेळण्याबाबत निर्णयाची प्रतिक्षा करत आहोत, असे पाकिस्तान टेनिस फेडरेशनकडून सांगण्यात आले. भारतीय टेनिस संघटनेने आमच्याकडे ११ अधिकारी आणि ७ खेळाडूंच्या व्हिसाची यादी पाठवली आहे, तरीही त्यांच्या अंतिम होकाराची आम्ही वाट पहात आहोत, असे पाक टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष सलीम सैफुल्हा यांनी सांगितले. आमच्या सरकारकडून मान्यता मिळाली की आम्ही लगेचच तुम्हाला होकार कळवू, असेही भारतीय संघटनेकडून कळवले असल्याचे सैफुल्हा म्हणाले.

दरम्यान भारताकडून आम्ही या डेव्हिस करंडक सामन्यात खेळण्याबाबत निर्णयाची प्रतिक्षा करत आहोत, असे पाकिस्तान टेनिस फेडरेशनकडून सांगण्यात आले. भारतीय टेनिस संघटनेने आमच्याकडे ११ अधिकारी आणि ७ खेळाडूंच्या व्हिसाची यादी पाठवली आहे, तरीही त्यांच्या अंतिम होकाराची आम्ही वाट पहात आहोत, असे पाक टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष सलीम सैफुल्हा यांनी सांगितले. आमच्या सरकारकडून मान्यता मिळाली की आम्ही लगेचच तुम्हाला होकार कळवू, असेही भारतीय संघटनेकडून कळवले असल्याचे सैफुल्हा म्हणाले.

इस्लामबादमध्ये येण्यासाठी होकार कळवण्याची अंतिम मुदत आहे. त्याअगोदर भारतीय संघटनेकडून आम्हाला होकार कळवायला हवा. ही डेडलाईन पाळली नाही तर भारताने हा सामना सोडला असेल होईल आणि आम्हाला पूर्ण गुण बहाल केले जातील, असेही सैफुला यांनी सांगितले. भारतीय टेनिस संघ या अगोदर १९६४ मध्ये पाकिस्तानमध्ये डेव्हिस करंडक सामना खेळण्यास गेला होता. अख्तर अली, प्रेमजित लाल आणि एसपी मिश्रा यांच्या भारतीय संघाने पाकिस्तानवर ४-० अशी मात केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT