BCCI Start IPL Media Rights e-Tender Process esakal
IPL

BCCIची तिजोरी ओसंडून वाहणार; IPL प्रसारण हक्कासाठी टेंडर प्रक्रिया सुरू

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल (2023 - 2027) प्रसारण हक्काबाबतच्या निविदा (IPL Media Rights) प्रक्रियेला सुरूवात केल्याची घोषणा बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शहा यांनी आज केली. बीसीसीआयने या निविदा प्रक्रियेसाठी ई ऑक्शनची सुविधा देणार आहे. अशी सुविधा आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच देण्यात येईल. याबाबतची अंतिम प्रक्रिया 12 जून पर्यंत पूर्ण होणार आहे. यंदाच्या प्रसारण हक्क प्रक्रियेतून बीसीसीआयला जवळपास 50 हजार कोटी रूपयांच्या कमाईची अपेक्षा आहे.

जय शहा यांनी आयपीएलच्या प्रसारण हक्काबाबतच्या लिलाव प्रक्रियेची माहिती ट्विट करून दिली. त्यांनी 'दोन नवे संघ, जास्त सामने, जास्त प्रेक्षक, जास्त व्हेन्यू आम्ही टाटा आयपीएल एका वेगळ्याच उंचीवर जाईल अशी अपेक्षा करतोय.' जय शहा पुढे म्हणाले की, 'आम्हाला या प्रक्रियेद्वारे जास्तीजास्त कमाई करता येईल असा अंदाज आहे. याचबरोबर यामुळे गुणवत्तेत देखील जास्तीजास्त वाढ होईल. यामुळे शेवटी भारतीय क्रिकेटलाच मोठा लाभ होणार आहे.'

सध्याच्या घडीला आयपीएलचे भारतात लाईव्ह स्ट्रिमिंग करण्याचे अधिकार फक्त डिस्ने प्लस हॉटस्टारकडे आहेत. आता आयपीएलच्या 15 व्या हंगामापासून सामन्यांची संख्या 60 वरून 74 वर गेली आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामापासून गुजरात आणि लखनौ या दोन नव्या संघांचा समावेश होणार आहे. त्यामुळे आयपीएलचे प्रसारण हक्क मिळवण्यासाठी झी, सोनी, रिलायन्सचे व्हायकॉम 18 ग्रुप यांच्यात चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

याचबरोबर बीसीसीआयला आयपीएलच्या डिजीटल स्पेससाठी देखील चांगली टक्कर होण्याची अपेक्षा आहे. यात अॅमेझॉन प्राईम, मेटा आणि यूट्यूब यांच्यात स्पर्धा होण्याची शक्यता आहे. या लिलाव प्रक्रियेसंदर्भातील नियम आणि अटी या इनव्हिटेशन टू टेंडर मध्ये सविस्तर देण्यात आले आहेत. याबाबतचे डॉक्युमेंट इच्छुकांनी बीसीसीआयकडे 25 लाख रूपये ( जीएसटी वेगळा ) भरल्यानंतर मिळणार आहे. ही रक्कम नॉन रिफंडेबल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

PSI Merit List Issue : पीएसआयची गुणवत्ता यादी रखडल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

बाळंतपणानंतर थायरॉईडची समस्या वाढतेय? शरीरातील 'या' बदलांकडे करू नका दुर्लक्ष

SHRAVAN 2026 : “श्रावणात भोलेनाथांची विशेष कृपा! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार”

कसा झालेला 'अशी ही बनवाबनवी' मधल्या शंतनूचा मृत्यू? पत्नीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं; आम्ही चौघेही...

SCROLL FOR NEXT