Rohit-Sharma-Mumbai-Indians 
IPL

IPL 2021: "म्हणून आम्ही हारलो"; हिटमॅनने दिली प्रामाणिक कबुली

विराज भागवत

दिल्लीच्या विजयामुळे मुंबईचं टेन्शन वाढलं...

IPL 2021 MI vs DC: शारजाच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर मात केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकात 8 बाद 129 धावा करत दिल्ली कॅपिटल्ससमोर 130 धावांचे लक्ष्य ठेवले होते. आघाडीची फलंदाजी कोलमडल्यानंतर श्रेयस अय्यरने मैदानात तग धरला. त्याला अश्विनने उत्तम साथ दिली. या दोघांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 4 गडी आणि 5 चेंडू राखत सामना खिशात घातला. या पराभवानंतर रोहित शर्मा काय म्हणाला वाचा...

रोहित शर्मा काय म्हणाला...

"या मैदानावर धावा करणं काहीसं कठीण आहे हे आम्हाला माहिती होतं. आम्ही या मैदानावर झालेल्या अनेक सामन्यांचा अभ्यास केला होता. या मैदानावर सहजासहजी धावा करता येत नाहीत याची आम्हाला कल्पना होती. आम्ही सामन्याची योग्य पद्धतीने तयारी केली होती. आम्हाला काय करायचं होतं ते आम्हाला माहिती होतं. १७०-१८० धावा या मैदानावर होणार नाहीत हेही आम्हाला माहिती होतं. त्यामुळे १४० धावांचं गणित आमच्या डोक्यात होतं. पण काही ठिकाणी आमची गणितं फसली आणि आम्हाला पराभूत व्हावं लागलं", अशी प्रामाणिक कबुली रोहित शर्माने दिली.

"आम्ही फलंदाजीची सुरुवात वाईट केली. आमच्या फलंदाजांना भागीदारी करता आल्या नाहीत. तुमच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नसेल आणि तुम्ही अपेक्षित धावांचे आव्हान समोरच्या संघाला दिलेले नसेल तर तसे सामने जिंकणं खूप कठीण असतं. आमच्या फलंदाजांची चूक झाली आणि मी ती चूक मान्य करतो. आमच्या मधल्या फळीतील खेळाडूंनी डाव सावरायला हवा होता, पण त्यांना ते शक्य झालं नाही. आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळलो नाही. आमच्या लौकिकाला साजेसा खेळ आम्हाला करता आला नाही याचं दु:ख आहे. मी अशी आशा करतो की उर्वरित दोन सामन्यांमध्ये आम्ही लौकिकाला साजेसा खेळ करून दाखवू", असा विश्वास मुंबईच्या हिटमॅनने व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT