Shubhman Gill_Virendra Sehwag 
IPL

IPL 2023 : शुभमनच्या तडाखेबाज खेळीवर सेहवागही फिदा; म्हणाला, भूक...

आयपीएलच्या प्लेऑफच्या सामन्यात आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये सामना सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

अहमदाबाद : गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलच्या तडाखेबाज खेळीवर टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग देखील फिदा झाला आहे. सेहवागनं ट्विट करत शुभमनचं कौतूक केलं आहे. चार सामन्यात केलेल्या तीन शतकी खेळी म्हणजे त्याच्यातील धावांची भूक दाखवून देते, अशा शब्दांत सेहवागनं त्याच्या खेळीचं कौतुक केलं आहे. (IPL 2023 Virendra Sehwag became fan on Shubhman Gill brilliant innings)

सेहवागनं ट्वीट करत म्हटलं, "काय खेळाडू आहे, 4 सामन्यात तिसरं शतक आणि काही चित्तथरारक शॉट्स. अप्रतिम सातत्य आणि धावांची भूक, मोठे खेळाडू ज्या प्रकारची खेळी करतात त्याप्रमाणं शुभमनची तडाखेबाज खेळी"

शुभमन गिल एकटाच भिडला!

गुजरात टायटन्सचे शतक 12व्या षटकात धाव फलकावर लावल्यानंतर शुभमन गिलने आपल्या इनिंगचा 5 वा गिअर टाकला. त्यानं गेल्या सामन्यातील स्टार आकाश माधवाल, अनुभवी पियुष चावला यांचा खरपूस समाचार घेत षटकारांची बरसात केली. दुसऱ्याच षटकात 21 आणि 13 व्या षटकात 20 धावा चोपत संघाला 15 व्या षटकात 150 धावांपर्यंत पोहचवलं. शुभमन गिलनं 49 चेंडूत आपलं शतक पूर्ण करत हंगामातील तिसरे शतकही ठोकलं. यामध्ये 8 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे गटातील नेत्याला मारण्यासाठी चोरबाजारातले चॉपर अन् देशी पिस्तुलचा वापर, प्रदीप पूर्णेकर हत्याकांडात धक्कादायक माहिती समोर!

IND vs NZ 2nd T20I Live: वैभव सूर्यवंशीची एन्ट्री, कोणत्या क्रमांकावर खेळणार? भारताच्या Playing XI मध्ये 2 बदल, टॉस जिंकला अन्..

Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावरून पर्यटन आणि व्यापाराला चालना! नऊ नवीन देशांतर्गत सेवा; गुवाहाटी, रांचीसह अन्य शहरांचा समावेश

Latest Marathi News Live Update : कोरड्या कृष्णा नदीपात्रात राजू शेट्टी यांचे ठिय्या आंदोलन

Healthcare Investment: आदिवासी भागांत पोहोचणार हायटेक आरोग्य सेवा; मोबाईल मेडिकल युनिट्स आणि टेलिमेडिसिनचा होणार विस्तार; ५०० रोजगारांच्या संधी

SCROLL FOR NEXT