IPL 2024 Advertisement Hardik Pandya Vs Shreyas Iyer esakal
IPL

IPL 2024 Hardik Pandya Vs Shreyas Iyer : मख्खन, ढक्कन.... आयपीएलच्या तोंडावर पांड्या अन् अय्यरचं हे चाललंय काय?

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Advertisement Hardik Pandya Vs Shreyas Iyer : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. लोकसभा निवडणूक आणि आयपीएलचा 17 वा हंगाम हे दोन्ही एकाचवेळी होत असल्याने पुढचे दोन महिने देशात धुमशान होणार आहे. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम आणि आयपीएलसाठीची जाहिरात साधारणपणे एकाच दिवशी प्रसिद्ध झाले.

आयपीएल 2024 संदर्भातील ड्रीम इलेव्हनने एक नवी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत हार्दिक पांड्या आणि इशान किशन हे श्रेयस अय्यरची टर उडवताना दिसत आहेत. मात्र या जाहिरातीत ज्या शब्दांचा वापर झाला आहे ती थोडी आक्षेपार्ह वाटतात.

जाहिरातीत हार्दिक पांड्या आणि इशान किशन हे केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरसाठी, ' 10 रूपये का मख्खन अय्यर भाई ढक्कन.' असे स्लोगन वापरले.

यावर अय्यरने देखील प्रतिक्रिया दिली असून कोण ढक्कन आणि कोण मख्खन हे काही दिवसातच कळेल हार्दिक अन् इशान सामन्यावेळी भेटू!

या जाहिरातीत रोहित शर्मा आणि ऋषभ पंत देखील आहेत. ही जाहिरात भारतीय संघातील खेळाडू आयपीएल आल्यावर कसे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात हे दाखवण्याचा प्रयत्न करते.

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चे सुरुवातीचे सामने गमावू शकतो, टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं होतं. रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विदर्भाविरुद्ध मुंबईसाठी 95 धावांच्या खेळीनंतर अय्यरच्या पाठीच्या जुन्या दुखापतीने पुन्हा एकदा उचल खालली. 2023 मध्ये, त्याच दुखापतीमुळे अय्यरवर शस्त्रक्रिया झाली आणि अलीकडील घडामोडींमुळे तो आयपीएल 2024 च्या पहिल्या काही सामन्यांना मुकू शकतो.

टाईम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी सांगितले की, 'त्याची स्थिती चांगली नाही. जुनी पाठीची दुखापत वाढली आहे. रणजी ट्रॉफीच्या पाचव्या दिवशी तो मैदानावर उतरेल याची शक्यता कमी आहे. तो आयपीएलचे काही सामने देखील मुकू शकतो.'

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT