Rohit Sharma’s Wife on Mark Boucher marathi news sakal
IPL

IPL 2024 : 'किती चुकीच्या गोष्टी...' रोहित शर्माच्या पत्नीच्या एका कमेंटने मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये उडाली खळबळ

Kiran Mahanavar

Rohit Sharma’s Wife on Mark Boucher : आयपीएलच्या लिलावापूर्वी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले, तेव्हा बरीच चर्चा रंगली होती. रोहित शर्माने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे वाद निर्माण झाला.

आता काही महिन्यांनंतर एमआयचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी अखेर रोहितऐवजी हार्दिकला कर्णधार का करण्यात आले याचा खुलासा केला आहे. मात्र, रोहितची पत्नी रितिका याला सहमत नाही. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एका कमेंट केली, त्यामुळे मुंबईच्या कॅम्पमध्ये खळबळ उडाली.

खरंतर, रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून का काढून टाकण्यात आले या प्रश्नाचे उत्तर देताना मार्क बाउचर स्मॅश स्पोर्ट्सच्या पॉडकास्टमध्ये म्हणाला की, 'माझ्या मते हा निर्णय क्रिकेटशी संबंधित आहे. हार्दिक पांड्याला खेळाडू म्हणून संघात परत आणण्यासाठी आम्हीला विंडो मिळाली. मुंबईसाठी हा बदलाचा काळ आहे. भारतीय चाहत्यांना हे समजत नाही आणि ते खूप भावूक होतात. पण या सगळ्यापासून भावनांना दूर ठेवावे लागते. हा फक्त क्रिकेटचा निर्णय आहे. आता रोहितमधील सर्वोत्तम कामगिरी समोर येईल. तो क्रीजवर जाऊन त्याच्या फलंदाजीचा आनंद घेईल आणि धावा काढेल.

स्मॅश स्पोर्ट्सने हा पॉडकास्ट आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने या पोस्टवर कमेंट करून खळबळ उडवून दिली आहे. या पोस्टवर कमेंट करताना रितिकाने लिहिले की, यात अनेक गोष्टी चुकीच्या आहेत.

रितिकाच्या या कमेंटनंतर आता मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला त्याच्या इच्छेविरुद्ध कर्णधारपदावरून हटवले असल्याचे मानले जात आहे. त्याच्या या कमेंटने मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : पुणे -मुंबई जुना महामार्गावर वंचित कडून रास्ता रोको

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT