IPL 2021 
IPL

IPL साठी अभेद्य 'बायो-बबल' कवच; 750 + खेळाडू आणि स्टाफ मेंबर्सची कोरोना टेस्ट

कोरोनाच्या पाश्वभूमीवर बीसीसीआयने चांगलीच कंबर कसली आहे.

सुशांत जाधव

कोरोनामुळे भारतातील आयपीएल स्पर्धा निम्म्यावरच स्थगित झाली. आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने दुसऱ्या टप्प्यात युएईच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पाश्वभूमीवर बीसीसीआयने चांगलीच कंबर कसली असून अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, स्पोर्ट्स मेडिसीन सपोर्ट, स्पेशलिस्ट टेली कंसल्टेशन, डॉक्टर ऑन कॉल, रुग्णवाहिका आणि VPS हेल्थ केयर सेवा सहज उपलब्ध करुन देणाऱ्या UAE तील आरोग्य संस्थांशी बीसीसीआयने करार केला आहे.

मेडिसीन आणि कोविड 19 व्यवस्थापनासाठी 100 सदस्यांची विशेष समती स्थापन करण्यात आली आहे. जी खेळाडूंना मदतीसाठी सदोदित उपलब्ध असेल. प्रत्येक सामन्यासाठी स्टेडियममध्ये दोन मेडिकल टीम उपलब्ध असतील. या टीममध्ये डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिक्स आणि लॅब टेक्निशियनचा समावेश असेल.

IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात 8 टीम एकूण 31 सामने खेळणार आहेत. दुबई, शारजा आणि अबू धाबी या तीन मैदानात 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत स्पर्धा पार पडेल.

सर्वाधिक कोरोना टेस्ट

दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी UAE मध्ये पोहचलेल्या खेळाडूंना कोरोना चाचणीला सामोरे जावे लागत आहे. दुबई आणि अबूधाबी येथील 14 हॉटेलमध्ये जवळवास 750 खेळाडू आणि स्टाफ सदस्यांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. नव्या कोरोना प्रोटोकॉलनुसार, सर्व खेळाडू आणि स्टाफ सदस्यांना तीन दिवसाच्या अंतराने कोरोना टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. स्पर्धेदरम्यान 30 हजार कोरोना टेस्ट होतील. याशिवाय सुरक्षित बायो-बबलसाठी डॉक्टर्ससह अन्य मेडिकल स्टाफला हॉटेलमध्येच थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2019 नंतर पहिल्यांदा प्रेक्षकांना एन्ट्री

IPLच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यासाठी मर्यादित प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. 2019 नंतर पहिल्यांदा स्पर्धेसाठी प्रेक्षकांची उपस्थिती दिसणार आहे. स्टेडियमच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT