KL Rahul Fit for IPL 2024 Marathi News sakal
IPL

KL Rahul : IPL च्या तोंडावर BCCIची केएल राहुलबाबत मोठी घोषणा! संपूर्ण हंगाम खेळायचा असेल तर...

KL Rahul Fit for IPL 2024 News : आयपीएल 2024 चा थरार सुरू होण्यासाठी फक्त 4 दिवस बाकी आहेत. यादरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे.

Kiran Mahanavar

KL Rahul Fit for IPL 2024 News : आयपीएल 2024 चा थरार सुरू होण्यासाठी फक्त 4 दिवस बाकी आहेत. यादरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे.

केएल राहुलला इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधाराला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (NCA) फिटनेस प्रमाणपत्र दिले आहे. याचा अर्थ तो आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे. एक-दोन दिवसांत तो संघात सामील होईल. लखनऊ सुपर जायंट्स त्यांच्या आयपीएल मोहिमेला रविवारी जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध सुरुवात करणार आहे.

खरं तर, बीसीसीआयच्या वैद्यकीय केएल राहुलला तंदुरुस्त घोषित केले आहे. पण त्याने सांगितले की, राहुलला संपूर्ण हंगाम खेळायचा असेल तर आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये विकेटकीपिंग न करण्याचा सल्ला बीसीसीआयने दिला आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, 'केएल राहुल तंदुरुस्त आहे आणि येत्या काही दिवसांत तो आयपीएल फ्रँचायझीमध्ये सामील होऊ शकतो. त्याला त्याच्या मांडीतील स्नायूमध्ये वेदना होत होत्या आणि त्याला इंजेक्शन देखील देण्यात आले आहे. एनसीएने त्याला आता तंदुरुस्त घोषित केले आहे. पण, त्याला सध्या विकेटकीपिंग न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

केएल राहुलने इंग्लंडविरुद्धच्या हैदराबाद कसोटीनंतर दुखापतीची तक्रार केली होती आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून तो बाहेर पडला. त्यावेळी भारताने ही मालिका 4-1 ने जिंकली.

बीसीसीआयने सुरुवातीला दावा केला होता की, राहुल 90 टक्के मॅच फिटनेसवर पोहोचला आहे आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली तो वेगाने बरा होत आहे. पण नंतर त्याने इंग्लंडमधील तज्ञाचा सल्ला घेण्याचे ठरवले आणि त्यानंतर तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला.

केएल राहुलच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने आतापर्यंत 118 सामने खेळले आहेत. आणि सध्या तो लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे, परंतु याआधी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जचा भाग होता.

आयपीएल सामन्यांमध्ये केएल राहुलने 134.42 च्या स्ट्राइक रेटने आणि 46.78 च्या उत्कृष्ट सरासरीने 4163 धावा केल्या आहेत. केएल राहुलने आयपीएल सामन्यांमध्ये 4 शतके झळकावली आहेत. याशिवाय पन्नास धावांचा आकडा 33 वेळा पार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE OSM Controversy : CBSE चा मोठा निर्णय! थेट अध्यक्षांची उचलबांगडी, मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; नेमकं कारण काय?

Velhe News : खानापूर-पानशेत मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT