IPL 2024 MI Vs DC Playing-11 sakal
IPL

MI Vs DC Playing-11 : सूर्याच्या एंट्रीनंतर पांड्या कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता? स्टार खेळाडूच्या दुखापतीमुळे दिल्लीचीही चिंतेत

Mumbai Indians vs Delhi Capitals Playing 11 IPL 2024 : आयपीएल 2024 चा 20 वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 7 एप्रिल रोजी दुपारी 3:30 वाजता खेळला जाणार आहे.

Kiran Mahanavar

Mumbai Indians vs Delhi Capitals Playing 11 IPL 2024 : आयपीएल 2024 चा 20 वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 7 एप्रिल रोजी दुपारी 3:30 वाजता खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार सराव करत आहेत.

पहिल्या तीन सामन्यांमध्ये लागोपाठ तीन पराभवानंतर मुंबई आपले खाते उघडण्याच्या प्रतीक्षेत आहे, तर दिल्लीचा संघही पहिल्या चारपैकी तीन सामन्यात पराभूत झाला आहे. मुंबईला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल.

सूर्यकुमार यादवच्या एंट्रीने कोण होणार बाहेर?

आता मुंबईच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे सूर्यकुमार यादव संघात सामील झाला आहे. तो खेळणार हे जवळपास निश्चित दिसत आहे. जर हार्दिकने त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी दिली तर नमन धीर बाहेर जाऊ शकतो.

तिन्ही सामन्यांमध्ये त्याची शांत राहिली होती. अशा स्थितीत दिल्लीविरुद्ध त्याच्या जागी सूर्याला संधी मिळू शकते. याशिवाय गेल्या मोसमातील स्टार नेहल वढेराही या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

कुलदीप यादवच्या जागी कोण खेळणार?

मुंबई इंडियन्सच झाले... पण दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग 11 वरही सस्पेंस निर्माण झाला आहे. कुलदीप यादव दुखापतीमुळे मुंबईविरुद्ध बाहेर पडणे निश्चित आहे. त्याची पोकळी भरून काढणे कोणालाही कठीण जाईल.

कुलदीप हा चायनामन गोलंदाज असून त्याची जागा घेणे सध्याच्या घडीला कोणत्याही खेळाडूसाठी सोपे नाही. एकतर पंत कुलदीपच्या जागी आणखी एका फलंदाजाला खेळवेल अन्यथा या सामन्यात ललित यादवला संधी मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT