Mumbai Indians Sakal
IPL

मुंबई इंडियन्सला धक्का! IPL 2024 मधील सुरुवातीच्या सामन्यांना 'हा' वेगवान गोलंदाज मुकणार

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने 4 कोटींहून अधिक रक्कम देत खरेदी केलेला वेगवान गोलंदाज आयपएल 2024 मधील सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Indians News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलचा हा हंगाम सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सने डिसेंबरमध्ये लिलावात खरेदी केलेला श्रीलंकेचा गोलंदाज दिलशान मदुशंका हा आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे.

मदुशंका बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेसाठी श्रीलंका संघाचा भाग होता. मात्र या मालिकेतील दुसरा सामना खेळताना त्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला गोलंदाजी करतानाच मैदान सोडावे लागले. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याचे उघड झाले आहे.

या दुखापतीमुळे तो बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातूनही बाहेर झाला आहे. तसेच तो काही आयपीएल सामन्यांनाही मुकण्याची शक्यता आहे.

त्याच्या दुखापतीबद्दल श्रीलंका क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे की 'मदुशंका सध्या चालू असलेल्या बांगलादेश दौऱ्यातून बाहेर झाला आहे. तो दुसऱ्या वनडेत दुखापत झाल्यानंतर त्यातून सावरण्यासाठी घरी परतला आहे.'

'मदुशंकाला दुसऱ्या वनडेदरम्यान गोलंदाजी करतानाच मैदान सोडावे लागले होते, आता त्याला डाव्या हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असल्याचे एमआरआय स्कॅनमधून स्पष्ट झाले आहे.'

मदुशंका सध्या चांगल्या फॉर्ममध्येही होता. त्याने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या दोन्ही वनडेत प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत.

मदुशंकाला डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने 4.6 कोटी रुपये मोजत संघात घेतले होते. दरम्यान, सध्या मुंबई इंडियन्सकडे वेगवान गोलंदाजांचे चांगले आक्रमण आहे. जसप्रीत बुमराह, जेसन बेऱ्हेंडॉर्फ, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर आणि नुवान तुषारा असे वेगवान गोलंदाज मुंबई संघात आहेत.

दरम्यान, मुंबईला गेराल्ड कोएत्झीच्या दुखापतीचीही चिंता आहे. तो भारताविरुद्ध 2023 च्या अखेरीस कसोटी मालिकेत खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. सध्या तो मुंबई इंडियन्स संघात दाखल झाला आहे, परंतु, त्याच्याही सुरुवातीच्या काही सामन्यांत खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.

मुंबई इंडियन्सला आयपीएल 2024 मधील पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध 24 मार्चला अहमदाबादला खेळवला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT