Mumbai Indians Luke Wood as replacement for Behrendorff Marathi News 
IPL

IPL 2024 च्या तीन दिवस आधी मुंबईच्या संघात मोठा बदल! 'या' स्टार खेळाडूची अचानक ताफ्यात एन्ट्री

Mumbai Indians Fast Bowler Jason Behrendorff Ruled Out IPL 2024 : आयपीएल 2024 च्या अवघ्या तीन दिवस आधी मुंबई इंडियन्सला मोठा दुसरा मोठा धक्का बसला आहे.

Kiran Mahanavar

Mumbai Indians Luke Wood as replacement for Behrendorff : आयपीएल 2024 चा येत्या 22 मार्चपासून थरार रंगणार आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.

दरम्यान आयपीएल 2024 च्या अवघ्या तीन दिवस आधी मुंबई इंडियन्सला दुसरा मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीगमधून बाहेर गेला. आयपीएलच्या गेल्या हंगामात त्याने 12 सामन्यात 14 विकेट घेतल्या होत्या.

जेसन बेहरेनडॉर्फची ​​दुखापत हा मुंबई इंडियन्ससाठी 24 तासांत दुसरा धक्का आहे. श्रीलंकेचा दिलशान मधुशंका एक दिवस आधी जखमी झाला होता. दिलशान मदुशंकाच्या फिटनेस अहवालात असे म्हटले आहे की, तो पुढील काही दिवस सामना खेळू शकत नाही. म्हणजेच IPL (IPL 2024) च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो मुंबई इंडियन्ससोबत दिसणार नाही.

मुंबई इंडियन्सने जेसन बेहरनडॉर्फच्या जागी इंग्लंडच्या ल्यूक वुडचा आपल्या संघात समावेश केला आहे. ल्यूक वुड ऑस्ट्रेलियाच्या बेहरनडॉर्फसारखा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. ल्यूक वुडला आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी 50 लाख रुपये मूळ किंमतवर ताफ्यात घेतले.

28 वर्षीय ल्यूक वुडने आतापर्यंत इंग्लंडकडून दोन वनडे आणि 5 टी-20 सामने खेळले आहेत. या 5 टी-20 सामन्यात त्याने 8 विकेट घेतल्या आहेत. ल्यूक वुडने बिग बॅश लीग, पीएसएलसारख्या टी-20 लीग क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने 140 टी-20 सामन्यात 147 विकेट घेतल्या आहेत.

आयपीएल 2024 साठी मुंबई संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमॅरिओ शेफर्ड, हरिद्री शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT