Ruturaj Gaikwad Marriage 
IPL

Ruturaj Gaikwad Marriage : शुभमंगल सावधान! ऋतुराज गायकवाडच लग्न ठरलं पण...

Kiran Mahanavar

Ruturaj Gaikwad Marriage : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. तिसरा सलामीवीर म्हणून संघात सामील झालेल्या ऋतुराज गायकवाडची जागा आता यशस्वी जैस्वाल घेणार आहे. भारतीय संघात अचानक झालेल्या या बदलाचे कारण म्हणजे 3 ते 4 जून दरम्यान होणारे ऋतुराज गायकवाडचे लग्न.

ऋतुराज गायकवाड आयपीएल 16 व्या मोसमानंतर आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी लग्न करणार आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या रिपोर्टमध्ये ऋतुराज लग्नामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळणार नाही.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हलमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा सामना खेळणार आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान होणार आहे तर 12 जून राखीव दिवल ठेवला आहे. ऋतुराजला या सामन्यासाठी टीम इंडियात राखीव खेळाडू म्हणून घेतले होते.

आयपीएल संपल्यानंतर निवड झालेले उर्वरित खेळाडू लंडनला रवाना होणार आहे. मात्र ऋतुराजला लग्नामुळे पोहचायला विलंब होणार आहे. ऋतुराज गायकवाडने याबाबत बीसीसीआयला कळवले असून 5 जूनपर्यंत संघात सहभागी होण्याचे आवाहन केल्याचे वृत्त आहे. पण संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी थेट बदलीची मागणी केली. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, जैस्वालला टीम इंडिया व्यवस्थापनाने लाल चेंडूने सराव करण्यासही सांगितले आहे.

पण कोण आहे ती मुलगी ?

ऋतुराज गायकवाडचे मराठी अभिनेत्री सायली संजीव हीच्यासोबत खूपदा नाव जोडले गेले पण दोघांनीही आमच्यात काहीच नसल्याचं स्पष्ट केलं आहे. एक वर्षांपूर्वी ऋतुराजने इंस्टा स्टोरी शेअर केली होती की, माझी विकेट फक्त बॉलरच घेऊ शकतो.

तर सायलीने सांगितले की आम्ही चांगले मित्र आहोत, त्यामुळे या चर्चा बंद झाल्या. मग ऋतुराजला नक्क कोणी बोल्ड केलंय, हे लवकरच स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Strawberry Cultivation : आंबेगाव, खेड, जुन्नर व मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४.९६ कोटी रुपये निधी मंजूर; विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

SCROLL FOR NEXT