IPL 2021 : श्रेयस जागतिक दर्जाचा खेळाडू sakal
IPL

IPL 2021 : श्रेयस जागतिक दर्जाचा खेळाडू

‘दिल्ली कॅपिटल्स’चा प्रशिक्षक रिकी पाँटिंग याचे मत

सकाळ वृत्तसेवा

दुबई : ‘‘श्रेयस अय्यर हा जागतिक दर्जाचा खेळाडू असून तो संघात परतल्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाला फायदा होणार आहे,’’ असे मत दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक व ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने व्यक्त केले आहे. कोरोनामुळे स्थगित कराव्या लागलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या सत्राला येत्या १९ तारखेपासून सुरुवात होत आहे व त्यासाठी पाँटिंग संघाच्या ताफ्यात सामील झाला आहे. श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे पाच महिन्यांनंतर संघात पुनरागमन करत आहे.

‘‘श्रेयस एक असा खेळाडू आहे जो कायम हसतमुख असतो, सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा मारून त्यांना प्रेरित करतो, मीही अनेकदा त्याच्याशी संवाद साधतो. त्यामुळे तो संघात परतल्याने संघाची बाजू भक्कम झाली आहे. तो एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे, यात कसलीही शंका नाही.’’ असे पाँटिंग या वेळी म्हणाला.

तसेच आयपीएलच्या दुसऱ्या सत्रासाठी संघात दाखल होताना आनंद होत असून खेळाडूही स्पर्धापूर्व सराव शिबिरामध्ये चांगला उत्साह दाखवत असल्याचे मत पॉंटिंगने यावेळी मांडले आहे. पुढे तो म्हणाला की, ‘‘मी दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यामध्ये परत येण्यासाठी चार महिन्यांपासून वाट पाहत आहे. जेव्हा मी संघासोबत काम करत असतो तेव्हा माझा वेळ खूप छान जातो. माझ्या कॅलेंडर वर्षातील हा एक चांगला वेळ असतो. सध्या खेळाडू चांगला उत्साह दाखवत असून त्यांची सरावातील तीव्रता आणि वृत्ती पाहून हे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर मुख्य स्पर्धेसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. दुसऱ्या सत्रासाठी मी अत्यंत उत्सुक आहे.’’ असे ४६ वर्षीय पाँटिंगने बोलताना म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर शेअर बाजार उसळला! सेन्सेक्स 2600 अंकांनी वाढला; कोणते शेअर्स फायद्यात?

IPL 2026, DC vs GT: गुजरातला कर्णधार गिलच्या कमबॅकची, तर दिल्लीला केएल राहुलच्या योगदानाची प्रतीक्षा; कशी असेल प्लेइंग-११

Bhondu Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणातील सोशल मीडियावरील 4500 लिंक नष्ट

'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेची वेळ बदलली, १३ एप्रिलपासून दोन मालिकेच्या वेळेत मोठा बदल, दुसरी कोणती मालिका?

Latest Marathi News Live Update: वर्क फ्रॉम होमच्या आमिषाने 17.5 लाखांची फसवणूक; एक आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT