IPL 2023 SRH vs LSG Play-offs Race  
IPL

IPL 2023 SRH vs LSG : प्ले-ऑफची शर्यत रंजक! लखनौ-हैदराबादची विजयासाठी झुंज

प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी विजय महत्त्वाचा...

सकाळ ऑनलाईन टीम

IPL 2023 SRH vs LSG Play-offs Race : लखनौ सुपर जायंटस्‌ आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज आयपीएलमधील लढत रंगणार आहे. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी विजय महत्त्वाचा आहे. लखनौ सुपर जायंटस्‌ संघाने ११ सामन्यांमधून ११ गुणांची कमाई केली आहे, तर सनरायझर्स हैदराबादने १० सामन्यांमधून ८ गुणांची कमाई केली आहे. याप्रसंगी

लखनौचा संघ सहाव्या विजयासाठी, तर हैदराबादचा संघ पाचव्या विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. लखनौने उर्वरित तीन लढतींमध्ये विजय मिळवल्यास त्यांचे १७ गुण होतील. अशा परिस्थितीत त्यांना प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी अधिक असेल.

कर्णधार के. एल. राहुल दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेच्या बाहेर गेला आहे. त्याच्या अनुपस्थितीत काईल मेयर्स (३५९ धावा), निकोलस पुरन (२४८ धावा), मार्कस स्टॉयनिस (२३९ धावा), आयुष बदोनी (२१२ धावा) व क्विंटॉन डी कॉक (७० धावा) यांच्या खांद्यावर लखनौच्या फलंदाजीची जबाबदारी असणार आहे.

आजची लढत

सनरायझर्स हैदराबाद - लखनौ सुपर जायंट्स

स्थळ- हैदराबाद वेळ- दुपारी ३.३० वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT