Suryakumar Yadav | IPL 2024 Sakal
IPL

Suryakumar Yadav: ठरलं तर! सूर्या दिल्लीविरुद्ध मुंबई इंडियन्ससाठी उतरणार मैदानात, टीममेट्सनेच दिली गुडन्यूज

IPL 2024, MI vs DC: सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्ससह सरावाला सुरुवात केली असून त्याला पाहून संघसहकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याचा सरावादरम्यानचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Suryakumar Yadav IPL: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत रविवारी (7 एप्रिल) मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना होणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला आनंदाची बातमी मिळाली आहे.

या सामन्यात खेळण्यासाठी मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवही उपलब्ध असणार आहे. सूर्यकुमार या सामन्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती संघसहकारी नमन धीरने दिली आहे, याबाबत पीटीआयने माहिती दिली आहे.

सूर्याची सरावालाही सुरुवात

सूर्यकुमारने मुंबई इंडियन्ससह सरावालाही सुरुवात केली आहे. त्याचे नेटमध्ये सरावाचे फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. सरावादरम्यान, त्याचे मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंनी स्वागतही केले. तसेच त्याला पाहून आनंद झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सूर्यकुमार गेल्या काही दिवसांपासून तंदुरुस्ती मिळवण्याचा प्रयत्न करत होता.  गुडघ्यावरील शस्त्रक्रिया आणि त्यानंतर स्पोर्टस हार्निया या दुखापतींमुळे त्याला बराच काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते.

त्यातूनच सावरल्यानंतर तो तंदुरुस्ती मिळवण्यासाठी बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होता. आता तो पूर्ण तंदुरुस्त झाला असून मुंबई संघात आयपीएल २०२४ साठी सहभागी झाला आहे.

मुंबईला विजयाची प्रतिक्षा

आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला अद्याप विजयाची प्रतिक्षा आहे.

मुंबईने आत्तापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही सामन्यात पराभव स्विकारला आहे. आता दिल्लीविरुद्ध वानखेडेवर होणाऱ्या सामन्यात मुंबई पहिल्या विजयासाठी प्रयत्न करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT