virat kohli glenn maxwell playing football training session rcb ipl 2024 sakal
IPL

IPL 2024 : ट्रेनिंग सेशनमध्ये किंग कोहलीचा दिसला नवा अवतार, फलंदाजी सोडून करत होता 'हे' काम, Video Viral

Royal Challengers Bangalore IPL 2024 : रविवारी सकाळी मुंबईत दाखल झालेल्या विराट कोहलीने बंगळूर गाठले आणि लगेचच आयपीएलसाठी आपल्या बंगळूर चॅलेंजर्स संघासोबत सरावही सुरू केला.

Kiran Mahanavar

Virat Kohli RCB IPL 2024 : रविवारी सकाळी मुंबईत दाखल झालेल्या विराट कोहलीने बंगळूर गाठले आणि लगेचच आयपीएलसाठी आपल्या बंगळूर चॅलेंजर्स संघासोबत सरावही सुरू केला. बंगळूर आणि गतविजेते चेन्नई यांच्यातील येत्या शुक्रवारी होणाऱ्या सामन्यातून आयपीएलची सुरुवात होत आहे. ट्रेनिंग सेशनमध्ये किंग कोहली नवा अवतार दिसला.

विराट कोहलीचा सरावाच्या पहिल्या दिवशी भर वॉर्मअपवर होता. तो कर्णधार फाफ डुप्लेसीबरोबर चर्चा करताना दिसत होता. त्यानंतर त्याने फलंदाजी सराव न करता. वॉर्मअपमध्ये तो ग्लेन मॅक्सवेलसह फुटबॉल खेळला. दोन दिवसांच्या सरावानंतर बंगळूरचा संघ चेन्नईस रवाना होईल.

विराट कोहली भारतीय संघातील प्रमुख खेळाडू असला तरी आयपीएल संपल्यानंतर लगेचच होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी कोहलीच्या कामगिरीवर अधिक लक्ष असणार आहे. विराट कोहलीला या विश्वकरंडक स्पर्धेतून वगळले जाऊ शकते, असे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले आहे.

२०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेनंतर विराट कोहली टी-२० प्रकारापासून दूर होता; परंतु जानेवारी महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात तो खेळला होता.

ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करेल, असे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी जाहीर केलेले आहे. त्यामुळे विराट कोहलीही त्या संघाचा भाग असेल.

महिला आयपीएलमध्ये बंगळूरच्या संघाने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात दिल्लीचा पराभव करून विजेतेपद मिळवले. त्यानंतर विराटने व्हिडीओ कॉल करून आपल्या महिला संघाचा आनंद द्विगुणीत केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20I Live: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम! अनोखे 'शतक' अन् मोडला रोहित शर्माच्या नावावर असलेला विक्रम

Digital Arrest Scam:‘दोन तासांत दिल्लीला या’; पोलिसांच्या नावाने धमकावून ४३ लाख उकळले

Latest Marathi News Live Update : ‘मुलांकडे माहिती आहे, पण ज्ञान नाही; शिक्षकांची जबाबदारी मोठी’ – देवेंद्र फडणवीस

Alephata Garbage: आळेफाटा बायपासवर कचऱ्याचे ढीग; दुर्गंधीने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त

IND vs NZ 2nd T20: भारतीय गोलंदाजांचा सुरुवातीला कहर, मग फिलिप्स-जॅकोब्सचा पलटवार! न्यूझीलंडने डाव सावरला, अखेर काय घडलं?

SCROLL FOR NEXT