Virat Kohli Slowest Hundred in the IPL History sakal
IPL

Virat Kohli : शतक ठोकल... इतिहास रचला... तरी कोहलीच्या नावावर नोंदवला गेला एक लज्जास्पद विक्रम

Virat Kohli Slowest Hundred in the IPL History : विराट कोहलीने शनिवारी आयपीएल 2024 च्या 19 व्या सामन्यात शानदार शतक झळकावले.

Kiran Mahanavar

Virat Kohli Slowest Hundred IPL : विराट कोहलीने शनिवारी आयपीएल 2024 च्या 19 व्या सामन्यात शानदार शतक झळकावले. विराटने राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. या डावात त्याने 67 चेंडूत शतक झळकावले. तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्रीजवर राहिला आणि त्याने 72 चेंडूत 113 धावांची नाबाद खेळी खेळली. या इनिंगमध्ये विराटच्या बॅटमधून 12 चौकार आणि 4 षटकार आले. मात्र या डावात विराटच्या नावावर इतिहासासोबतच एका लाजिरवाण्या विक्रमाचीही नोंद झाली.

प्रथम विराटने रचलेल्या इतिहासाबद्दल बोलूया.... विराट कोहली याआधीच आयपीएलमध्ये सर्वाधिक सात शतके करणारा खेळाडू होता. हे त्याचे आठवे शतक होते. त्यांच्याशिवाय ख्रिस गेलने सहा शतके आणि जोस बटलरने पाच शतके आयपीएल मध्ये झळकावली आहेत.

विराटचे हे टी-20 मधील नववे शतक आहे. त्याने ॲरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि मायकेल क्लिंगर यांना मागे टाकले ज्यांनी प्रत्येकी आठ शतके झळकावली. सर्वाधिक टी-20 शतके झळकावण्याच्या बाबतीत तो ख्रिस गेल (22) आणि बाबर आझम (11) यांच्या मागे आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके

  • ख्रिस गेल – 22

  • बाबर आझम – 11

  • विराट कोहली – 9

  • डेव्हिड वॉर्नर – 8

  • आरोन फिंच – 8

  • मायकेल क्लिंगर – 8

विराट कोहलीची ही खेळी ऐतिहासिक असतानाच त्याच्या नावावर एक लज्जास्पद विक्रमही नोंदवला गेला. कोहली आता आयपीएलमध्ये सर्वात संथ शतक झळकावणारा खेळाडू बनला आहे. 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध 67 चेंडूत शतक झळकावताना हा विक्रम मनीष पांडेच्या नावावर होता. या इनिंगमध्ये विराट कोहलीने 67 चेंडूत शतक झळकावले. या यादीत विराट आणि मनीषशिवाय सचिन तेंडुलकर, जोस बटलर आणि डेव्हिड वॉर्नर यांचीही नावे आहेत ज्यांनी ६६-६६ चेंडूत शतके झळकावली.

आयपीएल इतिहासातील सर्वात संथ शतक

  • मनीष पांडे – 67 चेंडू, विरुद्ध डेक्कन चार्जर्स (2009)

  • विराट कोहली – 67 चेंडू, विरुद्ध राजस्थान रॉयल्स (2024 )

  • सचिन तेंडुलकर – 66 चेंडू, विरुद्ध कोची टस्कर्स (2011)

  • डेव्हिड वॉर्नर - 66 चेंडू, विरुद्ध केकेआर (2010)

  • जोस बटलर – 66 चेंडू, विरुद्ध मुंबई इंडियन्स (2022)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Recruitment : जिद्दीला सलाम! गवंडी काम करत धरणग्रस्त शब्बीर सय्यद यांची मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीत चमकदार झेप

Who is Krish Bhagat? ३ दिवसांपूर्वी रिप्लेसमेंट, आज Mumbai Indians कडून पदार्पण; आमदाराचा पुतण्या IPL 2026 गाजवण्यासाठी सज्ज

Maharashtra Police Transfers : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या एसपींची बदली, पोलिस प्रशासनात मोठे बदल

Nashik Crime : भोंदू खरातला पाचव्या गुन्ह्यात २३ पर्यंत कोठडी; बचावपक्षाचा जोरदार विरोध

Chakur Crime News: नवऱ्याच्या प्रेयसीला फसवण्यासाठी चुलतीकडून पुतण्याचा खून

SCROLL FOR NEXT