Virat Kohli Wankhede Stadium Hardik Pandya sakal
IPL

MI vs RCB IPL 2024 : पांड्यासाठी रोहित शर्माला जे जमलं नाही ते विराट कोहलीने केलं... उचललं हे मोठं पाऊल, VIDEO

Virat Kohli Wankhede Stadium Hardik Pandya : हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यापासून त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच, वानखेडे आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवर चाहत्यांनी रोहित…रोहितच्या नारे लावून त्याला डिवचलं होते.

Kiran Mahanavar

Virat Kohli Wankhede Stadium Hardik Pandya : हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यापासून त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच, वानखेडे आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवर चाहत्यांनी रोहित…रोहितच्या नारे लावून त्याला डिवचलं होते.

असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले, जेव्हा हार्दिक पांड्या गुरुवारी आरसीबीविरुद्ध फलंदाजीसाठी उतरला. इकडे चाहत्यांनी त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला. पण विराट कोहलीकडून मैदानावर जे दिसले ते आतापर्यंत रोहित शर्माकडून दिसले नाही. विराट चाहत्यांसमोर हार्दिकच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.

विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो चाहत्यांना असे न करण्याची विनंती करताना दिसत आहे. कोहलीने त्याला हार्दिक पांड्याला चिडवू नका अशी विनंती केली. रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर पांड्या बॅटिंगला आला तेव्हा हा प्रकार घडला. किंग कोहलीच्या या विनंतीचा परिणाम असा झाला की चाहत्यांनी लगेचच पाठ फिरवली आणि स्टेडियममध्ये हार्दिक...हार्दिक...चा आवाज ऐकू येऊ लागला.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजीत चमकदार होता, त्याने 4 षटकात केवळ 21 धावा देत 5 बळी घेतले. 197 धावांचे लक्ष्यही त्यांनी अवघ्या 15.3 षटकात पूर्ण केले, त्यात इशान किशनने 34 चेंडूत 69 धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने अवघ्या 19 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. हार्दिक पांड्यानेही 6 चेंडूत 21 धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजयाकडे नेले. या आयपीएल मोसमातील 5 सामन्यांनंतर मुंबई इंडियन्सचा हा दुसरा विजय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT