wtc final 2023 
IPL

WTC Final 2023 : दुखापतीने वाढलं टेंशन! WTC फायनलपूर्वी टीम इंडियाच्या संघात होणार मोठा बदल

कर्णधार रोहित शर्माचे टेन्शन झाले दुप्पट...

Kiran Mahanavar

WTC Final 2023 Ind vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सात जूनपासून इंग्लंडमध्ये खेळल्या जाणार आहे. या शानदार सामन्यासाठी टीम इंडियाचे काही खेळाडू इंग्लंडलाही पोहोचले आहेत. उर्वरित खेळाडू आयपीएल फायनलनंतर इंग्लंडला रवाना होतील.

या सामन्यासाठी भारतीय संघाचे खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. पण यादरम्यान एका खेळाडूने संघ व्यवस्थापन आणि कर्णधार रोहित शर्माचे टेन्शन दुप्पट केले आहे. या खेळाडूच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या संघात मोठे बदल केले जाऊ शकतात.

सध्या भारतात आयपीएल खेळल्या जात आहे. शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा एक खेळाडू जखमी झाला. हा खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाचा देखील एक भाग आहे.

इशान किशन टीम इंडियासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी जाणार आहे, पण आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तो बाहेर पडला तर त्याच्या जागी कोणता खेळाडू जाऊ शकतो.

या खेळाडूला मिळू शकते संधी

केएल राहुलच्या दुखापतीमुळे इशान किशनचा टीम इंडियाच्या संघात समावेश करण्यात आला होता. केएल राहुललाही आयपीएलदरम्यान एका सामन्यात दुखापत झाली होती. असाच काहीसा प्रकार इशान किशनसोबत घडला आहे. आता इशान किशनच्या जागी सूर्यकुमार यादवला टीम इंडियात स्थान मिळू शकते. सूर्या चांगल्या फॉर्ममध्ये असून तो मधल्या फळीत टीम इंडियासाठी दीर्घ खेळी खेळू शकतो. इशानच्या जागी सूर्याचा संघात समावेश झाल्यास भारत केवळ एका यष्टिरक्षकासह अंतिम फेरीत जाईल.

WTC फायनलसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT