Irani Cup 2022 sakal
क्रीडा

Irani Cup 2022 : विजेत्या सौराष्ट्रलाही संधी; इराणी करंडक 1 ऑक्टोबरपासून

इराणी करंडक स्पर्धेचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बीसीसीआय या मोसमात दोन इराणी करंडक सामने खेळवणार आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली : इराणी करंडक स्पर्धेचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बीसीसीआय या मोसमात दोन इराणी करंडक सामने खेळवणार आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून कोलकता आणि अहमदाबादमध्ये अनुक्रमे मुश्ताक अली आणि विजय हजारे करंडक स्पर्धेचे बाद फेरीचे सामने होणार आहे.

२०२० चे रणजी विजेते सौराष्ट्र असल्यामुळे त्यांच्याविरुद्धचा गतवेळेस न झालेला इराणी सामना यावेळी १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे; तर यंदाचे रणजी विजेते मध्य प्रदेश आणि शेष भारत यांच्यातील इराणी करंडक सामना १ ते ५ मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे.

राष्ट्रीय अजिंक्यपद मुश्ताक अली द्वेन्टी-२० स्पर्धा ११ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर; तर विजय हजारे राष्ट्रीय अजिंक्यपदाची विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा १२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. लखनौ, इंदूर, राजकोट आणि जयपूक येथे मुश्ताक अली स्पर्धेचे साखळी सामने होतील; तर मुंबई, बंगळूरु, दिल्ली, कोलकता आणि रांची येथे एकदिवसीय स्पर्धेचे साखळी सामने पार पडतील. बीसीसीआयने यंदा पूर्ण मोसमाच्या रणजी स्पर्धेची आखणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT