Ishan Kishan WI vs IND esakal
क्रीडा

Ishan Kishan WI vs IND : अथनाजेनं असं काही केलं की इशान किशनचा चेहराच पडला; Photo व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Ishan Kishan WI vs IND : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर इशान किशनने आपला दम दाखवून दिला. त्याने या मालिकेत सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. बार्बाडोसच्या फिरकीला अन् वेगवान गोलंदाजांनाही साथ देणाऱ्या खेळपट्टीवर सलग दोन सामन्यात अर्धशतकी खेळी केल्याने इशान किशनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (West Indies Vs India 2nd ODI News)

मात्र इशान किशनच्या या आनंदावर पाणी फेरले ते विंडीजच्या अलिक अथनाजेने! इशान किशनने शुभमन गिल सोबत 90 धावांची सलामी दिली होती. गिल 34 धावांवर बाद झाल्यानंतर इशान किशनच्याच खांद्यावर भारताचा डाव पुढे नेण्याची जबाबदारी होती. (Ishan Kishan Wicket)

तो चेंडू चांगला मिडल देखील करत होता. मात्र त्यातच रोमारियो शेफर्डने एक अखुड टप्प्याचा चेंडू टाकला. इशान किशनने ही संधी वाया जावू न देण्याच्या इराद्याने या ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर जोरदार कट मारण्याचा प्रयत्न केला. (Alick Athanaze Catch)

मात्र पॉईंटला उभ्या असलेल्या अलिक अथनाजेने डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच हा झेल हवेत डाईव्ह मारत पकडला. हा झेल पासून प्रेक्षक, गोलंदाज, समालोचकांपासून सर्वच जण अवाक झाले.

दुसऱ्या बाजूला 55 चेंडूत 55 धावा करून शतकी खेळीचे मनसुबे बाळगणाऱ्या इशान किशनचा चेहराच पडला. जणू त्याला माहिती होतं की तो बाद झाल्यावर भारतीय फलंदाजांच्या विकेटची माळच लागणार आहे.

किशन बाद झाला त्यावेळी भारताच्या 95 धावा झाल्या होत्या. यानंतर अक्षर पटेल (1), हार्दिक पांड्या (7) आणि संजू सॅमसन (9) अवघ्या 18 धावांची भर घालून पॅव्हेलियनचा रस्ता धरला. भारताची अवस्था बिनबाद 90 पासून 5 बाद 113 धावा अशी झाली. दरम्यान, सामन्याचे 25 वे षटक सुरू असताना पाऊस आल्याने खेळ थांबवण्यात आला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT