Ishan Kishan News Marathi sakal
क्रीडा

Ind Vs Eng : भारतीय संघाबाहेर असलेला इशान किशन सध्या करतो तरी का? व्हिडिओ व्हायरल

India vs England Test series |

Kiran Mahanavar

Ishan Kishan News : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची शुक्रवारी 12 जानेवारी रोजी घोषणा करण्यात आली. या भारतीय संघात इशान किशनचे नाव नव्हते.

यापूर्वी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतही त्याची निवड झाली नव्हती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून अचानक परतल्यानंतर इशान किशनवर शिस्तभंगाची कारवाई झाल्याची मीडिया रिपोर्ट्समध्ये बरीच चर्चा रंगली होती.

त्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी इशान किशनला शिस्तभंगाच्या कारवाईमुळे भारतीय संघातून वगळण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण दिले. आता या सर्व वादानंतर इशानने सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून आगामी आव्हाने आणि समस्यांसाठी तो स्वत:ला कसा तयार करत आहे.

इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाची घोषणा होण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्याने ट्रेनिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो आपल्या दिवसाची सुरुवात ध्यानाने करतो. मग मैदानावर जाऊन पळतो, आणि वेगवेगळे व्यायाम करत आहे.

काही दिवसांपूर्वी द इंडियन एक्सप्रेसने इशान किशन वडोदरा येथे असल्याचे वृत्त दिले होते. तो मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्यासोबत सराव करत आहे. आता असे मानले जात आहे की, आयपीएलच्या आगामी मोसमापासून इशान किशन पुन्हा अॅक्शनमध्ये परतेल आणि या शक्यतेने डावखुरा फलंदाज पुन्हा सरावाला लागला आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिका जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची शेवटची टी-20 मालिका आहे. वर्ल्ड कपसाठी संघ निवडीत आयपीएल महत्त्वाची भूमिका बजावेल, असे प्रशिक्षक द्रविडने आधीच सांगितले आहे. अशा परिस्थितीत इशानने आयपीएलवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केल्याचे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

Latest Marathi News Live Update: कर्नाटक कॉंग्रेसचे आमदार खर्गेंच्या भेटीला

Pune Crime: गुन्हे शाखेकडून वाघोलीतील हातभट्टी जेसीबीने उद्ध्वस्त; दोन लाखाचा मुद्देमाल नष्ट, गुन्हे शाखेचा छापा!

SCROLL FOR NEXT