New Zealand 
क्रीडा

'तू किवींचा कोच नाही, हार्डवेअरच्या दुकानात काम कर'

वृत्तसंस्था

वेलिंग्टन : भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असताना आणि न्यूझीलंडचा संघ सातत्याने पराभूत असताना त्यांचे प्रमुख प्रशिक्षक गॅरी स्टेड मात्र सुटीवर गेले आहे. त्यामुळे त्याच्यावर न्यूझीलंडचा माजी कर्णधार जेरमी कोनी याने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी गॅरी यांना हार्डवेअरच्या दुकानात काम करण्याचा सल्ला दिला आहे. 

गॅरी स्टेड यांना रोजच आपल्या कुटुंबाची भेट घ्यायची असेल तर त्यांनी हार्डवेअरच्या दुकानात काम करावे असा सल्ला कोनीने त्यांना दिला आहे. 

ते म्हणाले, ''हा न्यूझीलंडसाठी सर्वांत महत्वाचा मोसम असताना गॅरीने असे सुटीवर जाणे योग्य नाही. यापूर्वी संघ मालिकेत 0-1 असा पिछाडीवर असताना कोणत्याही प्रशिक्षकाने सुटी घेतलेली आपण पाहिली आहे का? एवढ्या महत्वाच्या क्षणी त्यांनी संघाला सोडून निघून जाणे अत्यंत चुकीचे आहे. संघाला जेव्हा सर्वाधिक गरज असते तेव्हा तुम्ही अंग काढून घेणे चुकीचे आहे.''

कोनी यांच्या दृष्टीने भारताविरुद्धची ही मालिका सर्वाधिक महत्वाची आणि कठिण आहे. त्यामुळे गॅरी यांच्या सुटी घेण्याचा निर्णय त्यांना फारसा रुचलेला नाही. ते म्हणाला, ''मला या गोष्टीचा राग आला आहे. भारताविरुद्धच्या मालिकेनंतर होणाऱ्या मालिकांसाठी ते आता विश्रांती घेत आहेत. मात्र, यानंतर अशा कोणत्या महत्वाच्या मालिका आहेत? यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी तीन टी20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका आहे. त्यानंतर किवींना मार्च, एप्रिल, मे आणि जूनचे काही आठवडे कोणतेही सामने खेळयाचे नाही. त्यानंतर संघ आयर्लंड, स्कॉटलंड आणि वेस्ट इंडीजविरुद्ध खेळणार आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India: हवेतच घडला थरार... दिल्लीला जाणारं एअर इंडियाचं विमान ३०० फूट खाली, १० प्रवासी अन् ४ कर्मचारी जखमी! नेमकं काय घडलं?

IND vs SL : भारतीय संघ श्रीलंकेसाठी रवाना, विमानतळावर 'एक' फलंदाज नाही दिसला; दौऱ्याला मुकण्याची शक्यता... जसप्रीतनंतर आणखी एक धक्का?

Pune Water Supply Update : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीकपात पूर्णपणे रद्द, खडकवासला धरण क्षेत्रात मुबलक पाणीसाठ्यामुळे मिटली चिंता

Satej Patil emotional post for father : सतेज पाटलांची वडिलांसाठी भावनिक पोस्ट, 'आधारवड हरपला..! दादांनी आयुष्यभर माणसं जोडली'

Marathi Live Updates News: ई-२० शकिराच्या भारत दौऱ्याची चर्चा; पुण्यातही रंगणार संगीताचा जल्लोष?

SCROLL FOR NEXT