Ind vs Eng 1st Test ेोकोत
क्रीडा

Ind vs Eng 1st Test : केएल राहुलच्या हातातून गेली विकेटकीपिंग, या खेळाडूला मिळणार जबाबदारी; कोच द्रविड स्पष्टच बोलले

भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज

Kiran Mahanavar

India vs England Test News :

हैदराबाद : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी घरच्या मैदानावर टीम इंडियाच्या योजना काय आहेत याबद्दल काही संकेत दिले आहेत. केएल राहुल यष्टिरक्षक म्हणून दिसणार नसल्याचे भारतीय मुख्य प्रशिक्षकाने स्पष्ट केले आहे. यांचा अर्थ केएस भरत आणि ध्रुव जुरेल यांच्यात यष्टीरक्षकाच्या भूमिकेसाठी स्पर्धा होऊ शकते.

द्रविड म्हणाला की, 'राहुल मालिकेत यष्टिरक्षक म्हणून खेळणार नाही. मला वाटते की आम्ही निवडीबद्दल अगदी स्पष्ट आहे. यासाठी आम्ही आधी दोन व्यक्तींची निवड केली आहे. राहुलने दक्षिण आफ्रिकेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. आणि ती मालिका अनिर्णित राहिली होती, परंतु ही पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. ही परिस्थितीत लक्ष्यात घेता, इतर दोन यष्टीरक्षक संघात घेतले आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघ स्टार फलंदाज विराट कोहली खेळणार नाही. विराटने वैयक्तिक कारणांमुळे संघातून माघार घेण्याची विनंती केली होती. अनुभवी फलंदाज रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल, तर स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह उपकर्णधाराची भूमिका बजावेल. भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणात आवेश खान, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार यांचाही 16 सदस्यीय मजबूत संघात समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघ 25 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. हा सामना 25 ते 29 जानेवारी दरम्यान हैदराबादमध्ये खेळला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणम येथे तर तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघ राजकोटमध्ये 15 ते 19 फेब्रुवारीदरम्यान खेळला जाईल. चौथा 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान रांची येथे आणि या मालिकेतील शेवटचा सामना 7 मार्च ते 11 मार्च दरम्यान धरमशाला येथे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : महागाईचा झटका ! एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक LPG चे ताजे दर

Singapore Open Win: आधी सलग ४ वेळा अपयश, पण सिंगापूर ओपनमध्ये भारतीय वाघांची थेट पहिल्या स्थानावर मुसंडी!

Ujani Temple: उजनीतील प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा पुन्हा उजेडात; पाणी साठा घटल्याने पळसनाथ मंदिराचे दर्शन, पाच दशकांनंतरही सुस्थितीत

Maharashtra Weather: राज्यात पुढील दोन दिवस वादळी पाऊस, मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात गावठी दारुच्या ५४ हातभट्ट्या, ४ वर्षांत दोन लाख लिटर दारु, ३० लाख रसायन लिटर नष्ट; गावागावांत हातभट्टीचा महापूर, वाचा...

SCROLL FOR NEXT