Kuldeep Yadav India Vs West Indies  esakal
क्रीडा

Kuldeep Yadav : अखेर कुलदीप यादवने विंडीजचा धडाका रोखला तरी भारताला चेस करावं लागणार अवघड टार्गेट

अनिरुद्ध संकपाळ

Kuldeep Yadav India Vs West Indies : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करत दमदार सुरूवात केली. सलामीवीर ब्रँडन किंग आणि कार्ल मेयर्स यांनी 55 धावांची सलामी दिली होती. त्यानंतर निकोलस पूरनने देखील धडाकेबाज सुरूवात केली.

मात्र भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने विंडीजला पाठोपाठ धक्के देत त्यांच्या धावगतीला वेसन घातले होते. कुलदीप यादवने 4 षटकात 28 धावा देत 3 बळी टिपले. मात्र विंडीजने किंगच्या 42 तर कर्णधार रेव्हमन पॉवेलच्या नाबाद 40 धावांची खेळी करत विंडीजला 20 षटकात 5 बाद 159 धावांपर्यंत मजल मारून दिली.

भारतासमोर विजयासाठी 160 धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे. पहिल्या दोन टी 20 सामन्यात 150 आणि 152 धावा झाल्या होत्या. पहिल्या सामन्यात भारताला 150 धावांचे आव्हान देखील पार करता आले नव्हते.

मात्र दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने ठेवलेले 153 धावांचे आव्हान विंडीजने 19 व्या षटकात 8 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले होते. दुसरा सामना झालेल्या मैदानावरच तिसरा सामना देखील होत आहे. ही भारतासाठी आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट आहे.

मात्र गयानाच्या प्रोव्हिडियन्स स्टेडियमवरच्या खेळपट्टीवरचा हा सलग दुसरा सामना आहे. त्यामुळे खेळपट्टी संथ झाली आहे. अशा खेळपट्टीवर 160 धावा चेस करणे हा टीम इंडियासाठी अवघड टास्क असणार आहे. पॉवर प्लेमध्ये चांगल्या धावा केल्या तर भारतीय संघाला 160 धावा चेस करणे अवघड जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT