Asian Games 2023  ESAKAL
क्रीडा

Asian Games 2023 : भारताची स्टार बॉक्सर लवलिनाने जिंकलं रौप्य पदक; भारत पदकांच्या पंचाहत्तरी जवळ

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लवलिना बोरगोहेनने एशियन गेम्स 2023 मध्ये महिला बॉक्सिंग 75 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. सुवर्ण पदकाच्या सामन्यात चीनच्या ली कियानने 5 - 0 असा पराभव केला. त्यामुळे लवलिनाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

लवलिनाच्या रूपेरी कामगिरीने भारताची पदकसंख्या ही 74 वर पोहचली आहे. भारताने आतापर्यंत 16 सुवर्ण 27 रौप्य आणि 31 कांस्य पदकांची कमाई केली आहे.

भारताने आज आर्चरीमध्ये सुवर्ण कामगिरी केली. मिश्र दुहेरीत ओजस देवताळे आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांनी दक्षिण कोरियाच्या जोडीला एका गुणाने मात देत सुवर्ण पदक पटकावले. आर्चरीमध्ये भारताने आतापर्यंत चार पदके पटकावली आहेत. ही आर्चरीमधील भारताची एशियन ग्म्समधील सर्वात चांगली कामगिरी आहे. याचबरोबर चालण्याच्या स्पर्धेत भारताच्या मंजू राणी आणि राम बाबू यांनी कांस्य पदक जिंकले. त्यांनी हे पदक 35 किलोमीटर चालण्याच्या मिश्र सांघिक प्रकारात पटकावले आहे.

भारताने आज स्क्वॉशच्या मिश्र दुहेरीत देखील कांस्य पदकाची कमाई केली. भारतीय जोडी अनहत सिंह आणि अभय सिंह यांनी सेमी फायनलमध्ये प्रवेश करत आपले कांस्य पदक निश्चित केले होते. मात्र त्याचा सेमी फायनलमध्ये मलेशियाच्या जोडीने 11 - 8, 2- 11, 9- 11 असा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT