Wrestlers Protest 
क्रीडा

Wrestlers Protest : 'रागाच्या भरात...' अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांचा UTurn 'त्या' वक्तव्याने प्रकरणात नवा ट्विस्ट

Kiran Mahanavar

Wrestlers Protest : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपांविरोधात कुस्तीपटूंनी निषेध केला. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरीकडे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात निवेदन दाखल करणाऱ्या एकमेव अल्पवयीन महिला कुस्तीपटूने आपले वक्तव्य बदलले आहे. अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी याला दुजोरा दिला आहे.

अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की, लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या 7 महिला कुस्तीपटूंपैकी एकमेव अल्पवयीन मुलीने न्यायदंडाधिकार्‍यांसमोर नोंदवलेल्या तिच्या आधीच्या जबाब बदला आहे. आता त्यांनी नवीन जबाब नोंदवला आहे. आता अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी न्यायालयात जाऊन आपले म्हणणे बदलण्याचा मुद्दा मान्य केला आहे.

वडील म्हणाले, 'जेव्हा पैलवानांनी आंदोलन सुरू केले आणि सांगितले की ब्रिजभूषण कुस्तीपटूंचा विनयभंग आणि गैरवर्तन करतो, तेव्हा मलाही वाटले की माझ्या मुलीशी भेदभाव केला जात आहे. कुस्ती महासंघाने भेदभाव केला होता, त्यामुळे रागाच्या भरात आम्ही 2-3 गोष्टी जोडल्या होत्या... आता मी कोणत्याही भीतीने किंवा दबावाखाली विधान बदललेले नाही.

सीआरपीसी कलम 164 अन्वये न्यायालयात जबाब नोंदवण्यात आला आहे. याआधीच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की अल्पवयीन कुस्तीपटू, ज्याच्या वडिलांच्या वक्तव्यावर ब्रिजभूषण विरुद्ध POCSO गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याने तक्रार मागे घेतली आहे.

दरम्यान, कुस्तीपटूंनी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. सरकारने आंदोलक पैलवानांना भाजप खासदाराविरुद्ध पोलिस तपास 15 जूनपर्यंत पूर्ण होण्याची प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे. त्यानंतर कुस्तीपटूंनी हे आंदोलन आठवडाभरासाठी स्थगित करण्याचे मान्य केले.

बुधवारी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत कुस्तीपटूंनी सुमारे पाच तास बैठक घेतली. यानंतर, कुस्तीपटूंनी सांगितले की, सरकारने त्यांना आश्वासन दिले आहे की पोलिस त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर देखील मागे घेतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT