Mohammed Shami  esakal
क्रीडा

Mohammed Shami : कानामागून आला अन् तिखट झाला! बेंचवरचा शामी मैदानात उतरला अन् श्रीनाथ, जहीरलाही टाकलं मागं

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Shami : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने आज पुन्हा एकदा मोठा धमाका केला. भारताने 358 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची अवस्था भारतीय वेगवान गोलंदाजांनी पळता भुई थोडी केली.

बुमराहने डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट काढत ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर मोहम्मद सिराजने देखील आपल्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. मोहम्मद शामीने मात्र आपल्या स्पेलच्या तिसऱ्या चेंडूवर विकेट घेतली. परंतु त्याने त्यानंतर विकेट्सचा धडाकाच लावला. शामीने बघता बघता 5 विकेट्स घेतल्या. याचबरोबर तो भारताकडून वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वात चांगली कामगिरी करणारा गोलंदाज ठरला.

मोहम्मद शामीने 14 डावात 45 विकेट्स घेतल्या. त्याने भारताकडून वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधित विकेट्स घेणाऱ्या जहीर खान ( 22 डावात 44 विकेट्स) आणि जवागल श्रीनाथ (33 डावात 44 विकेट्स) यांना मागे टाकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT