क्रीडा

मोहम्मद शमीची तंदुरुस्तीवर नजर ; राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी मत व्यक्त

अर्जुन पुरस्काराच्या रूपात मला मेहनतीचे फळ मिळाले आहे. जे नशिबात असते, ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. केंद्र सरकारचा पुरस्कार हा माझ्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखा आहे. यापुढेही मेहनत करीत राहीन. - मोहम्मद शमी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दुखापतीमधून सावरत असलेला भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज होत आहे. राष्ट्रपती भवनात मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अर्जुन पुरस्कारासाठी शमीची निवड झाली. याप्रसंगी तो म्हणाला, मला पुढील दोन मालिकांसाठी तंदुरुस्त व्हायचे आहे. त्यासाठी मी अधिक मेहनत घेत आहे.

मोहम्मद शमी सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीवर उपचार घेत आहे. तो या वेळी सांगतो, की माझ्यातील कौशल्याबाबत कोणताही दबाव घेण्याची गरज वाटत नाही. मी तंदुरुस्त झालो, तर कौशल्य मैदानात दाखवले जाईल. दरम्यान, ३३ वर्षीय शमी याने भारतात पार पडलेल्या एकदिवसीय विश्‍वकरंडकात २४ विकेट घेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

मागील वर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीला यंदा खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या जोडीला बक्षिसाच्या रूपात २५ लाख रुपये देण्यात आले.

अर्जुन पुरस्काराच्या रूपात मला मेहनतीचे फळ मिळाले आहे. जे नशिबात असते, ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. केंद्र सरकारचा पुरस्कार हा माझ्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखा आहे. यापुढेही मेहनत करीत राहीन.

मोहम्मद शमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

Solapur News : दोन कोटी रुपये खर्चून बेलाटीत उभारणार राम मंदिर; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

SCROLL FOR NEXT