Siraj-Kapil-Dev 
क्रीडा

IND vs ENG: सिराजने लॉर्ड्सवर मोडला कपिल देव यांचा विक्रम

विराज भागवत

१९८२ साली कपिल देव यांनी केला होता पराक्रम

Ind vs Eng 2nd Test: लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम मारा करत टीम इंडियाला १५१ धावांनी विजय मिळवून दिला. शेवटच्या दिवशी आधी शमी-बुमराह जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. नंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीपुढे गुडघे टेकले. भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने. त्याने आट गडी बाद करत थेट दिग्गज खेळाडू कपिल देव यांचा विक्रम मोडला.

भारताकडून दोन्ही डावात मोहम्मद सिराजने अप्रतिम कामगिरी केली. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा हे तीन दिग्गज गोलंदाज संघात असूनही दोन्ही डावात सर्वाधिक बळी मिळवण्याचा पराक्रम सिराजने केला. पहिल्या डावात सिराजने ४ बळी टिपले. या डावात इशांतने ३ तर शमीने २ बळी टिपले होते. तर दुसऱ्या डावातही सिराजने सर्वाधिक ४ बळी टिपले. या डावात बुमराहने ३, इशांतने २ तर शमीने १ बळी टिपला होता. लॉर्ड्सच्या मैदानावर एका सामन्यात ८ बळी घेणारा सिराज हा केवळ दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. या आधी कपिल देव यांनी १९८२ मध्ये १६८ धावांत ८ बळी टिपले होते. भारतीय गोलंदाजाची ही लॉर्ड्सवरील सर्वोत्तम कामगिरी होती. पण सिराजने संपूर्ण सामन्यात केवळ १२६ धावा देत ८ बळी टिपले आणि कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला.

VVS लक्ष्मणने केली सिराजची प्रशंसा

भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने सिराजसोबतचा एक जुना फोटो ट्विट केला आणि एक आठवण सांगितली. तसेच, त्याची प्रशंसा करत त्याला पुढील वाटीचालीसाठी शुभेच्छा दिल्या. "मी त्या खेळाडूला पहिल्यांदा खूप पूर्वी हैदराबादचे ज्येष्ठ क्रिकेटपटू अब्दुल अझीम यांच्या घरी भेटलो होतो. या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतक्या जलद गतीने केलेल्या प्रगतीमुळे मला त्याचा अभिमान वाटतो. एखाद्याच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी कठीण परिश्रम आणि इच्छाशक्ती यांच्या जोरावर माणून यश नक्की मिळवू शकतो याचं सिराज हे एक ठळक उदाहरण आहे. तरूण आणि तडफदार सिराजला माझ्या खूप खूप शुभेच्छा", अशा शब्दात लक्ष्मणने त्याचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT