MS Dhoni esakal
क्रीडा

MS Dhoni : माझीवाली वेगळी आहे असं... सिंगल लोकांना धोनीचा मोलाचा सल्ला

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni : भारतात वनडे वर्ल्डकपचा फिव्हर जोर धरू लागला आहे. भारताने मायदेशातील आपला दबदबा सुरूवातीच्या टप्प्यात तरी कायम राखत पाच पैकी पाच सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. भारत सेमी फायनलमध्ये पोहचण्याच अगदी जवळ पोहचला आहे.

दुसरीकडे 2011 च्या वर्ल्डकप विजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी सामने पाहण्यासाठी फार कमी वेळा मैदानावर दिसला आहे. तो सध्या आपल्या व्यावसायिक डील्स पूर्ण करण्यात व्यग्र झाला आहे. सध्या अशाच एका कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धोनी मैदानावर आपल्या अचूक रणनितीसाठी ओळखला जातो. त्याच्या नेतृत्वगुणाचे अनेक फॉलोअर्स आहेत. भारताचा आयकॉन असल्याने त्याचा सल्ला आजही टीम इंडियातील अनेक युवा खेळाडू घेत असतात. याच धोनीने आता बॅचलर तरूणांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.

धोनी या व्हिडिओत म्हणाला की, जर तुम्हाला असं कोणी मिळालं आहे जिच्यामुळे तुम्ही खरोखर खूश आहात. कृपा करून तिच्याशी लग्न करा.

धोनी पुढे म्हणाला की, 'इथे उपस्थित सर्व बॅचलर लोक ज्यांची गर्लफ्रेंड आहे मी तुमचा एक गैरसमज दूर करतो. तुम्ही कधी विचार करू नका की माझीवाली वेगळी आहे.'

एमएस धोनीच्या या सल्ल्यावर सर्वजण हसू लागले. ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मीम्स आणि कमेंटचा पाऊस पडला. धोनीच्या या सल्ल्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिली. धोनीने या व्हिडिओत आपल्या आयपीएलमधील भविष्याबाबत आणि गुडघ्याच्या दुखापतीबाबत अपडेट दिली.

धोनीने या व्हिडिओत अजून एक गोष्ट सांगितली. त्याला लोकांनी एक चांगला क्रिकेटपटू यापेक्षा एक चांगला व्यक्ती म्हणून ओळखावं असं वाटतं.

धोनीचा 2019 च्या वनडे वर्ल्डकपमधील सेमी फायनल सामना हा भारताकडूनचा शेवटचा सामना होता. त्यानंतर त्याने 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तो सध्या आयपीएल खेळत असून गेल्या हंगामातील विजेतेपदासोबतच धोनीने चेन्नई सुपर किंग्जला वेळा चॅम्पियन बनवलं आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT