Bajrang Punia Sakal
क्रीडा

Bajrang Punia : कुस्तीपटू बजरंगवर पुन्हा निलंबनाची कारवाई

भारतीय कुस्ती संघटनेकडून १० मार्च रोजी निवड चाचणी आयोजित करण्यात आली. या निवड चाचणीत सहभागी झालेल्या बजरंग पुनिया याने डोप टेस्टसाठी नकार दाखवला.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्यावर पुन्हा एकदा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोनीपत येथे झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीत डोप टेस्टसाठी नकार दाखवल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेकडून (नाडा) त्याला निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तसेच या नोटिसीला उत्तर देण्यासाठी त्याला ११ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

भारतीय कुस्ती संघटनेकडून १० मार्च रोजी निवड चाचणी आयोजित करण्यात आली. या निवड चाचणीत सहभागी झालेल्या बजरंग पुनिया याने डोप टेस्टसाठी नकार दाखवला. त्यामुळे नाडाकडून त्याला निलंबित करण्यात आले,

तसेच जागतिक कुस्ती संघटनेकडूनही त्याला शिक्षा ठोठावण्यात आली, पण काही दिवसांनंतर शिस्तपालन समितीकडून बजरंगवरील निलंबन मागे घेण्यात आले. कारण नाडाकडून नोटीस न दाखवता त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती, पण नाडाकडून आता पुन्हा एकदा त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime: भोगावच्या सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर छापा! पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई; २६ ग्राहकांसह १५ बारबाला आढळल्या

Marathi News Live Updates : पुण्यात आज MPSC विद्यार्थ्यांचा मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Pune News: अतिउच्चदाब वीज वाहिनीत स्फोट, 3 लाखांवर ग्राहकांचा वीज खंडित; PMPच्या ७० बसची सेवा ठप्प, ८ मेट्रोगाड्या २२ मिनिटं जागेवरच थांबल्या

Nepal Flood: १० दिवस ढिगाऱ्याखाली, तरीही जीवंत! नेपाळमध्ये ६० वर्षीय महिलेची थरारक सुटका

Pune Railway: पुणेकरांसाठी गणेशोत्सवाची रेल्वे भेट! कोकणवासीय प्रवाशांची सोय, पुणे-रत्नागिरी मार्गावर सहा फेऱ्या

SCROLL FOR NEXT