badminton sakal
क्रीडा

National Sports Competition : बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राला रौप्यपदकावर समाधान

२१-१९, २१-१३ असे नमवून आसामच्या स्पर्धेतील पहिल्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.

सकाळ वृत्तसेवा

पणजी - गोव्यात सुरू झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटनमध्ये सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या अंतिम सामन्यात कर्नाटकने सुवर्णपदक जिंकताना महाराष्ट्राचा ३-१ असा पराभव केला. महिलांच्या अंतिम सामन्यात आसामने महाराष्ट्राला ३-० असे नमवले.

पुरुष अंतिम लढतीत कर्नाटकच्या एस. भार्गव याने हर्षील दाणी याला तासभर चाललेल्या चुरशीच्या लढतीत १८-२१, २१-१९, २१-१५ असे नमवून कर्नाटकला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या एकेरीत रोहन गुरबानी याने पृथ्वी रॉय याची झुंज ४८ मिनिटांत मोडून काढताना २३-२१, २२-२४, २१-१४ असे नमवून महाराष्ट्राला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

दुहेरीत कर्नाटकच्या जोडीची सरशी झाली. एच. व्ही. नितीन व के. साई प्रतीक जोडीने महाराष्ट्राच्या दीप रंभिया व अक्षण शेट्टी जोडीला २१-१२, २१-१४ असे नमवून कर्नाटकला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. अंतिम लढतीतील तिसऱ्या एकेरीत आयुष शेट्टी याने दर्शन पुजारी याला २१-१६, २१-१७ असे ३६ मिनिटांत नमवले.

महिलांच्या अंतिम सामन्यात आसामने महाराष्ट्राचा ३-० असा पराभव केला. अंतिम लढतीत अश्मिता चलिहा हिने आसामला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तिने महाराष्ट्राच्या पूर्वा बर्वे हिला २१-१६, २१-११ असे ३३ मिनिटांत नमवले.

दुसऱ्या एकेरीत ईशारानी बरुआ हिने आलिशा नाईक हिला पहिला गेम गमावल्यानंतर ४० मिनिटांत ९-२१, २१-१३, २१-१८ असे पराजित केले. २-० या आघाडीनंतर दुहेरीत बाजी मारत आसामने सुवर्णपदक निश्चित केले. दुहेरीत ईशारानी व अश्मिता जोडीने सिमरन सिंघी व रितिका ठाकर जोडीला २१-१९, २१-१३ असे नमवून आसामच्या स्पर्धेतील पहिल्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT