Noida Techie Collapses On Pitch Dies Of Heart Attack While Playing Cricket latest News in marathi 
क्रीडा

Video : बॅटिंग करताना आला हृदयविकाराचा झटका अन् मैदानातच झाला मृत्यू! क्रिकेट विश्वात खळबळ

Kiran Mahanavar

क्रिकेट विश्वात खळबळ उडून जाणारी बातमी समोर आली आहे. नोएडा येथे क्रिकेट सामन्यादरम्यान एका खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विकास नेगी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. विकास अवघा 34 वर्षांचा होता. जो इंजिनीयर होता.

ही घटना शनिवारी घडली पण त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. नोएडाच्या सेक्टर 135 मध्ये बनवलेल्या स्टेडियममध्ये क्रिकेटचा सामना सुरू होता. हा सामना Maverick-11 आणि Blazing Bulls क्रिकेट संघांमधला खेळला गेला. येथे सामन्याच्या पहिल्या डावातच एक दुर्दैवी अपघात झाला.

Maverick-11ची फलंदाजी सुरू होती आणि उमेश कुमार आणि विकास नेगी खेळपट्टीवर होते. 14व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर उमेशने शामदार शॉट मारला आणि दुसऱ्या टोकाला उभा असलेला विकास धाव घेण्यासाठी धावला. पण चेंडू सीमारेषा पार केली ज्यामुळे संघाला चार धावा मिळाल्या.

शामदार चौकार मारल्यानंतर उमेशशी हस्तांदोलन केल्यावर विकास त्याच्या दुसऱ्या टोकाकडे परत जात होता. त्यानंतर अचानक तो खेळपट्टीवर पडला. त्याला पडताना पाहून यष्टिरक्षक त्यांच्याकडे पळाला. यानंतर गोलंदाज आणि फलंदाजही त्याच्याकडे धावले. काही क्षणातच सर्व खेळाडू विकासच्या भोवती जमा झाले.

त्याला लगेच सीपीआर दिला. यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विकास हा मूळचा उत्तराखंडचा होता. तो सध्या दिल्लीतील रोहिणी येथे राहत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तिकीट कापलं जाण्याची भीती, आमदाराचं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन; ट्रेनमध्ये 'अंडरवेअर कांड'मुळे होते चर्चेत

Palghar News:'हजारो आदिवासी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले'; घोषणाबाजीने कार्यालय दुमदूमले, सरकारचे लक्ष वेधणार

Giorgia Meloni : खूप सुंदर आहात, फक्त सिगारेट ओढू नका; PM मेलोनी यांना मिळाला सल्ला, इटलीच्या पंतप्रधान कोणती सिगारेट ओढतात?

अधुरी एक कहाणी...आज 'या' राजघराण्याच्या सुनबाई असतात लता मंगेशकर ! अखेरपर्यंत दोघंही राहिले अविवाहित

'Rohit Sharma, विराट कोहली मागील १०-१५ वर्ष खेळत आहेत, आता...'; शुभमन गिल हे असं का म्हणाला? गंभीरच्या विधानानंतर भाई सुटला...

SCROLL FOR NEXT