क्रीडा

Pakistan Cricket : ड्रेसिंग रूममध्ये झोपला तर याद राखा... पाकिस्तानी क्रिकेटपटूंना PCB ची तंबी

अनिरुद्ध संकपाळ

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. सध्या संघ मेलबर्न येथे बॉक्सिंग कसोटी खेळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान क्रिकेट संघात मोठे बदल झाले आहेत. तीनही फॉरमॅटचे कर्णधार बदलले असून निवडसमितीपासून प्रशिक्षकांपर्यंत सर्व काही बदललं आहे.

मोहम्मद हाफिज हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे तर वहाब रियाज हा निवडसमिती अध्यक्ष झाला आहे. या दोघांनी संघ व्यवस्थापनची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर अनेक बदल करण्यास सुरूवात केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघ व्यवस्थापनाने पाकिस्तानी क्रिकेटपटूंना ड्रेसिंगरूममध्ये न झोपण्याचा सल्ला दिला आहे. जर कोणी खेळाडू झोपताना दिसला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.

जिओ सुपर टीव्हीने दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय संघाचा संचालक मोहम्मद हाफिज यांनी संघात एक नवी एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) लागू केली आहे. यात जर एखादा खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये झोपताना आढळून आला तर त्याच्यावर 500 डॉलर दंड आकारण्यात येणार आहे.

पाकिस्तानी संघातील जे खेळाडू प्लेईंग 11 मध्ये नव्हते ते ड्रेसिंगरूममध्ये झोपलेले आढळून आले होते. हा प्रकार गेल्या संघ व्यवस्थापनच्या काळात झाला होता. यानंतर आता मोहम्मद हाफिजने संघाला सक्त ताकीद दिली आहे.

नव्या संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना स्टेडियममध्ये झोपण्यापेक्षा हॉटेल रूममध्ये झोपण्याचा सल्ला दिला आहे. हे सर्व कडक नियम संघात व्यावसायिकता आणण्यासाठी केले आहेत. मात्र हा सल्ला पाकिस्तानी संघातील काही खेळाडूंना रूचलेला नाही.

त्यांच्या मते हे सगळे कडक नियम 16 वर्षाखालील संघातील खेळाडूंसाठीचे आहेत. खेळाडूंमध्ये अविश्वासाचं वातावरण देखील आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT