Babar Azam fined sakal
क्रीडा

Babar Azam fined : साडेसाती काय बाबर आझमची पाठ सोडेना, भारतात येण्यापूर्वी पोलिसांनी केली कडक कारवाई

Kiran Mahanavar

Pakistan captain Babar Azam fined for speeding in Audi : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमची साडेसाती काय पाठ सोडेना. कारण आधी त्याला त्याचा भारतीय व्हिसा उशिरा मिळाला आणि आता पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली.

बाबर आझमने पुन्हा एकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. पाकिस्तान ट्रॅफिक पोलिसांनी बाबरला पकडले आणि पावती फाडली, ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बाबर आझमला गाड्यांची खूप आवड आहे. त्यामुळे त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो त्याच्या आलिशान गाड्या चालवतो. मात्र, पुन्हा एकदा वाहतुकीचे नियम मोडून तो पोलिसांच्या हाती लागला. टाईम्स ऑफ कराचीच्या वृत्तानुसार, पोलिसांनी बाबर आझमची पावती केले आहे. तो मर्यादेपेक्षा जास्त वेगाने कार चालवत होता, त्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला.

मात्र, वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना बाबरला पोलिसांनी पकडण्याची ही पहिलीच वेळ नाही. खरं तर, या वर्षाच्या सुरुवातीला बाबर आझमला नंबर प्लेट नसल्यामुळे पोलिसांनी थांबवले होते. मात्र, त्यानंतर नंबर प्लेट दुरुस्त करण्याचा इशारा देऊन सोडून देण्यात आले. मात्र, यावेळी ओव्हरस्पीडिंगमुळे पोलिसांना त्याला पावती काढावे लागले. हे पावती किती आहे याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळल्या जाणाऱ्या वर्ल्डकप सहभागी होण्यासाठी भारतात यावे लागणार आहे. चांगली गोष्ट म्हणजे उड्डाणाच्या अवघ्या 48 तास आधी त्याला भारतीय व्हिसा मिळाला.

अशा परिस्थितीत तो आता कोणत्याही अडचणीशिवाय भारतात परतणार आहे. पाकिस्तान संघ 27 सप्टेंबर रोजी दुबईमार्गे भारतीय शहरात हैदराबादला पोहोचेल. 29 सप्टेंबरलाच पाकिस्तान न्यूझीलंडसोबत पहिला सराव सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Corporation Protest: जंतर-मंतर आंदोलनाचे महापालिकेत पडसाद; सत्ताधारी-विरोधकांमध्ये घोषणाबाजी

Harmony Park: संगीताच्या सुरांमध्ये योगा आणि खेळ, ५० रुपयांच्या तिकिटात स्वप्नवत सफर! ३०० टन भंगारातून साकारल्या कलाकृती

Latest Marathi News Live Update : CJP चे सौरव दास आणि रांका चर्चेसाठी रवाना; थोड्याच वेळात सरकारसोबत बैठक, तोडगा निघणार?

सुबोध भावेने साकारली गोंदवलेकर महाराजांची भूमिका, अभिनेत्याबद्दल अनुभव सांगताना अर्थव सुदामे म्हणाला... 'त्यांनी पैसे...'

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

SCROLL FOR NEXT