Ayesha Naseem Retirement esakal
क्रीडा

Ayesha Naseem Retirement : पुढचं आयुष्य इस्लाम... पाकिस्तानी महिला क्रिकेटपटू 18 व्या वर्षी निवृत्त!

अनिरुद्ध संकपाळ

Ayesha Naseem Retirement : पाकिस्तानची महिला क्रिकेटपटू आयशा नसीमने अवघ्या 18 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. सहसा क्रिकेटपटूने 18 व्या वर्षी आपली कारकीर्द नुकतीच सुरू केलेली असते. अनेक खेळाडूंचे तर आंतरराष्ट्रीय पदार्पण देखील झालेले नसते. मात्र आयशाने या वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. (Pakistan Women's Cricket News)

आयशा नसीमने (Ayesha Naseem Retirement News) आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त तीन वर्षे पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. तिने वयाच्या 15 व्या वर्षी पाकिस्तान महिला क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. अवघ्या तीन वर्षात ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडत आहे. आयशाची कारकीर्द आता कुठे फुलू लागली होती.

गुरूवारी आयशाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सांगितले की आता ती आपले पुढचे आयुष्य हे इस्लामनुसार जगणार आहे. त्यामुळे ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आयशाचा हा निर्णय सर्वांसाठीच धक्कादायक आहे. (Pakistan Women Cricketer)

आयशाने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा 3 मार्च 2020 रोजी खेळला होता. तिने थायलंड महिला क्रिकेट संघाविरूद्ध आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तर 15 फेब्रुवारी 2023 ला आयर्लंडविरूद्ध खेळलेला सामना हा तिच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे.

आयशी नसीम ही टॉप ऑर्डर फलंदाज होती. तिने पाकिस्तान महिला क्रिकेट संघासाठी 4 वनडे सामने खेळले होते. या वनडे समन्यांमध्ये 8.25 च्या सरासरीने तिने 33 धावा केल्या होत्या. तिने 30 टी 20 सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले.

यात तिने 18.45 ची सरासरी आणि 128.12 च्या स्ट्राईक रेटने 369 धावा केल्या. यात तिने 45 धावांची सर्वोकृष्ट खेळी केली. भारताविरूद्ध तिने 3 टी20 सामने खेळले होते. त्यात तिने 62 धावा केल्या आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT