AUS vs PAK  esakal
क्रीडा

AUS vs PAK 2nd Test : पाकिस्तान - ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत PTV ने केलं प्रक्षेपण बंद, काय होतं कारण?

अनिरुद्ध संकपाळ

AUS vs PAK 2nd Test : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथे सुरू आहे. या कसोटी सामन्यात पाकिस्तानची अवस्था फार काही चांगली नाहीये. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 318 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात खेळताना पाकिस्तानने दुसऱ्या दिवसअखेर 6 बाद 194 धावा केल्या होत्या.

कसोटीच्या पहिल्या दिवशी एक मोठा ड्रामा देखील झाला आहे. ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटीचे देशांतर्गत प्रक्षेपण करणाऱ्या पाकिस्तानच्या पीटीव्हीने अचानक सामन्याचं प्रक्षेपण बंद केलं. यामागे एक वेगळंच कारण समोर आलं आहे.

पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथोरिटीने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही ब्रॉडकास्टरला सामन्याच्या प्रक्षेपणावेळी बेटिंग, गॅम्बलिंग कंपन्यांची जाहीरात करण्यास सक्त मानाई आहे. PEMRA ने पीटीव्ही करत असलेल्या ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान सामन्याच्या थेट प्रक्षेपणावर आक्षेप घेतला. त्यानंतर काही काळ प्रक्षेपण बंद होतं.

दरम्यान, टेन स्पोर्ट्स हे ऑस्ट्रेलियात सामन्याचे ब्रॉडकास्ट करते. त्यांनी बेटिंग स्पॉन्सरच्या लोगोसह ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान सामन्याचं प्रक्षेपण सुरूच ठेवलं होतं. पीटीव्हीने पहिल्या दिवशी सामन्याचं ब्रॉडकास्टिंग केलं नाही.

पीटीव्हीने एक वक्तव्य प्रसिद्ध करत सामन्याचं प्रक्षेपण पाकिस्तान सरकारच्या बेटिंग विरूद्धच्या कडक नियामांमुळे बंद केल्याचं सांगितले.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार पीटीव्ही स्पोर्ट्सने परवानगी मिळताच सामन्याचं प्रक्षेपण सुरू केले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT