Bengal Warriors vs UP Yoddha Match 3 Twitter
क्रीडा

प्रदीप नरवालचा फ्लॉप शो; Bengal Warriors समोर UP Yoddha हतबल

सुशांत जाधव

Pro Kabaddi League 2021, BengalWarriors vs UP Yoddha Match : प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने (BengalWarriors ) यूपी योद्धा (UP Yoddha) संघाला 38-33 अशा फरकाने पराभूत केले. बंगालच्या विजयात मोहम्मद नबीबख्शने मोलाची भूमिका बजावली. दुसऱ्या बाजूला यूपी योद्धा संघातील प्रदीप नरवाल फ्लॉप ठरवले. तो यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू आहे. बंगाल आणि यूपी (Bengal Warriors vs UP Yoddha) यांच्यातील सामना हा अटीतटीचा झाला.

बंगालकडून मोहम्मद नबीबख्श याने चढाईतून 11 गुण मिळवले दुसऱ्या बाजूला डिफेंडर सुकेश हेगडेने 8, कर्णधार मनिंदर सिंहने 7, आणि दर्शन जे याने 3 गुण मिळवले. यूपी योद्धाला स्टार खेळाडू प्रदीप नरवालकडून मोठी आस होती. पण सलामीच्या लढतीत तो नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. यूपी योद्धा संघातील स्टार खेळाडू प्रदीप नरवालने 8 रेडमध्ये 2 बोनससह केवळ 8 गुण मिळवले. त्याच्याकडून यापेक्षा उच्च दर्जाचा खेळाची अपेक्षा आहे.

प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच सलामीच्या दिवशी तीन लढती रंगल्याचे अनुभवायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेतील सर्व सामने बंगळुरुमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी पहिल्या चार दिवशी ट्रिपल हेडरची रंगत पाहायला मिळेल. पहिल्या दिवशी यू मुम्बा आणि बंगळुरु बुल्स यांच्यातील लढतीने स्पर्धेचा शुभारंभ झाला. पहिल्या सामन्यात यू मुम्बाने 46-30 अशा फरकाने बंगळुरु बुल्स संघाला पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात दाक्षिणात्य संघात कमालीची रंगत पाहायला मिळाली. तेलुगु टायटन्स आणि तमिळ थलायवाज यांच्यातील दुसरा सामना 40-40 असा बरोबरीत सुटला. त्यानंतर अखेरच्या सामन्यात बंगालनं विजयी नोंदवला.

सलामीच्या लढतीत 16 गुणांच्या फरकाने विजय नोंदवणाऱ्या यू मुम्बाच्या खात्यात 5 गुण जमा झाले आहेत. गुणतालिकेत ते अव्वलस्थानावर आहेत. त्यांच्या पाठोपाठ अखेरच्या सामन्यात विजय नोंदवणारा बंगाल वॉरियर्सचा संघ आहे. त्यांनी 5 गुणांच्या फरकाने सामना जिंकून 5 गुण कमावले आहेत. तेलुगू टायटन्स आणि तमिळ थलायवाज यांच्यातील सामना 40-40 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे या दोन्ही संघांना 3-3 गुण मिळाले आहेत. ते अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. बंगाल विरुद्धच्या पराभवानंतर यूपी योद्धाच्या खात्यात 1 गुण जमा झाला असून ते पाचव्या स्थानावर आहेत. पहिल्या सामन्यातील मोठ्या फऱकाने पराभवाला सामोरे गेल्यामुळे बंगळुरु बुल्स सर्वात तळाला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

Pune News : कालबाह्य चीज, चढ्या दराने पनीर, शाम्पू विकणे पडले महागात

हायव्होल्टेज ड्रामा! Virat Kohli च्या पर्सनल बॉडिगार्डकडून पत्रकारांना शिवीगाळ, BCCI च्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित; कार्डिफमध्ये राडा

Sakri-Shirdi Highway Protest: खड्ड्यांत वृक्षारोपण; राष्ट्रवादी काँग्रेसचे अनोखे आंदोलन "महामार्ग नव्हे, मृत्यूचा सापळा"; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT